टीम कृषी योजना/krushi yojana
राज्यात गेल्या आठवड्यात राज्यभर सुरू झालेल्या पावसाने काहीशी उघडीप दिली होती. तर अनेक जिल्ह्यात अद्याप पाऊसास सुरुवात झाली नाहीये,हवामान विभागाच्या वतीने पुढील 5 दिवसांचा अंदाज वर्तविण्यात आला असून राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. ( Forecast of torrential rains in Maharashtra Chance of heavy rain for the next five days.)
पाऊसाचा आगमनाने शेतीच्या कामांना वेग आल्याचे चित्र आहे,शेतकऱ्यांची बी-बियाणे,खते व शेतीकामात लगबग दिसते आहे. मुंबईत दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती आता पुन्हा एकदा मुंबईत पाऊसाचे जोरदार आगमन होईल असा अंदाज असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. उद्या गुरुवार दि 17 व 18 जून रोजी मुंबईच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील पाच दिवस जिल्हावार हवामान अंदाज आणि चेतावणी pic.twitter.com/7aIw7t9bWa
— Regional Meteorological Centre, Nagpur (@imdnagpur) June 16, 2021
विदर्भात पाऊसाची जोरदार बॅटिंग होणार
दिनांक 16 जून ते 20 जून पर्यंत विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवला आहे.या जिल्ह्यांमध्ये काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी देखील पुढचे तीन-चार दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. मुंबई ठाणे या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा अंदाज असल्याचे के एस होसाळीकर यांनी ट्विट द्वारे माहिती दिली आहे.
पुढचे 3, ४ दिवस कोकणांत मुसळधार पावसाची शक्यता, मुंबई ठाणे मध्ये पण.
मध्य महाराष्ट्र व विदर्भात हिhttps://t.co/eAIy8vzk7ehttps://t.co/VGQVXMkDHe
IMD pic.twitter.com/saVWVKjiW9— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 16, 2021