Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

पेरू च्या पिकातून कमावले चाळीस लाखांचे उत्पन्न | शेतकऱ्याची यशोगाथा | काय प्रयोग राबवले.

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

शेती म्हणजे तोटा,नुकसान व त्यातून मिळणार मनस्ताप असा काही लोकांचा समज आहे. शेती हा प्रमुख उत्पन्नांचे साधन म्हणून अनेक कुटुंब पिढ्यांपार शेती करतात त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.कमीतकमी शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न घेणारे देखील शेतकरी आपण बघतो. उसाचे पीक, कांद्याचे पीक यातून लाखो रुपये उत्पन्न घेणारे अनेक शेतकरी आपण बघितले असतील परंतु आज आपण अशा एका शेतकऱ्याची यशोगाथा बघणार आहोत ज्याने अपारंपरिक असा शेतीचा नवा प्रयोग राबवला व त्यातून थोडे थिडके नव्हे तर तब्बल ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.

हा महत्वाचा लेख नक्की वाचाफळबाग लागवड योजनेत शेतकऱ्यांना 50 हजारांपासून 1 लाखापर्यंत मदत, शासनाची तीन वर्षे आर्थिक मदत

ही महत्वाची योजना समजून घ्यागाई व म्हैस गोठा अनुदान योजना 2021 | 77000 रुपये अनुदान मिळणार | असा करा अर्ज

 

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील या शेतकऱ्याने तब्बल चाळीस लाख रुपयांचे उत्पन्न पेरूच्या माध्यमातून कमावले आहे. या शेतकऱ्याचे नाव बाळासाहेब गुंजाळ. बाळासाहेब गुंजाळ यांच्याकडे 35 एकर शेती दैठणे गुंजाळ या गावी आहे.
गुंजाळ यांनी अवघ्या 14 महिन्यांमध्ये आपल्या शेतीमधून चाळीस लाख रुपयांचे उत्पन्न ‘तैवान पेरू’ Taivan peru च्या माध्यमातून कमावले आहे. आगामी तीन महिन्यात आणखी 20 लाख रुपयांचे उत्पन्न होईल अशी माहिती त्यांनी दिली.

पेरू हे कमी पाण्यामध्ये येणारे उत्पन्न आहे. पेरूच्या झाडांना पावसाचे पाणी जरी मिळाले तरी हे झाड वाढत असते. तसेच त्याला इतर पाणी कमी लागते. त्यामुळे तैवान पेरूचे Taivan peru पीक घेण्याचा निर्णय घेतला. गुंजाळ यांनी दहा एकरमध्ये ८५०० झाडांची लागवड केली आहे.
तैवान पेरूला बाजार पेठेत मोठी मागणी आहे या एका पेरूचे वजन ४०० ते ९०० ग्रॅम पर्यंत मिळते. या पेरूचे हे वेगळे वैशिष्ट्य आहे.तैवान पेरूची गोडी थोडीशी कमी असल्यामुळे यास बाजारपेठेत मोठी मागणी आहे. इतर देशांमध्ये देखील ‘तैवान पेरू’ ला मोठी मागणी आहे.या पेरूची टिकवणं क्षमता चांगली असल्यामुळे हा लवकर खराब होत नाही.

गुंजाळ यांनी सांगितले की ‘तैवान पेरू’ Taivan peru च्या झाडांना ठिबक सिंचनद्वारे पाणी दिले जाते. यासाठी फारसे कष्ट लागत नाहीत व पाण्याचीही बचत होते. तसेच रासायनिक खत द्यावे लागत नाही. खर्च कमी व उत्पन्न जास्त देणारे पीक म्हणून केलेला गुंजाळ यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील पारंपारिक शेती सोबत हे पीक घेऊन आपल्या उत्पन्नात भर पाडावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Don`t copy text!