टीम कृषी योजना / Krushi Yojana
शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढवा,आपल्या पायावर आत्मनिर्भर होऊन जीवनमान उंचावे यासाठी सरकारच्या उपाययोजना सुरू असतात.प्रत्येक वर्षी विविध योजना सरकार आणत असते अशीच एक योजना केंद्र सरकारने गेल्या वर्षी आणली असून या योजनेचे नाव आहे ‘ पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना ‘
केंद्र सरकारने या योजनेस मंजुरी दिली असून या योजनेसाठी पंधरा हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत दूध प्रक्रिया मधील आईस्क्रीम ,चीज निर्मिती, दूध पाश्चरायझेशन, दूध पावडर , मास निर्मिती व प्रक्रिया , पशुखाद्य, बायपास प्रोटिन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशु पक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना 60 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कर्जाच्या व्याजदरांमध्ये तीन टक्के सूट देण्यात येणार आहे.
योजनेसाठी कुठे अर्ज करावा लागेल.?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम अर्ज करावा लागेल अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी केंद्र शासनाच्या पशुपालन व डेरी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी संकेतस्थळावरील पोर्टल द्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर http://ahd.maharashtra.gov.in ही लिंक दिली आहे.या योजनेच्या मार्गदर्शक सूचना मराठीत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
या योजनेचा लाभ व्यक्तिगत व्यावसायिक शेतकरी उत्पादक संस्था खाजगी संस्था कलम 88 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्यांना घेता येईल.योजनेचा राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी उपयुक्त असून राज्यातील इच्छुक व्यावसायिक उद्योजक व संस्था यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पशु संवर्धन आयुक्त यांनी केले आहे.