Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the fast-indexing-api domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/krushiyo/public_html/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the health-check domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/krushiyo/public_html/wp-includes/functions.php on line 6121
धरण पाणलोटात पुन्हा पाऊस सुरू ; धरणे भरण्याकडे शेतकऱ्यांचे लागले वेध. - krushiyojana.com
Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

धरण पाणलोटात पुन्हा पाऊस सुरू ; धरणे भरण्याकडे शेतकऱ्यांचे लागले वेध.

धरण पाणलोटात पुन्हा पाऊस सुरू ; धरणे भरण्याकडे शेतकऱ्यांचे लागले वेध.It starts raining again in the dam catchment; Farmers had to wait to fill the dam.

टीम कृषी योजना / Krushi Yojana

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा व मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रा मध्ये मोठ्या विश्रांती नंतर पुन्हा एकदा पाऊसास सुरूवात झाली असून. धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा या धरणा मध्ये ८३० क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे  हे पाणी निळवंडे धरणा मध्ये जमा होते आहे.तर निळवंडे या धरणा मधून ७०० क्युसेक वेगाने प्रवरा नदी पात्रात विसर्ग सुरू असल्याने प्रवरा नदी वाहती झाली आहे.

मोठ्या धरणां मध्ये पाण्याची आवक सुरू.

सध्या महाराष्ट्र राज्यात सर्व दूर मुसळधार पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे. परंतु, धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतासुर झाले होते. गुरुवार दि.19 ऑगस्ट पासून हे चित्र बदललताना दिसले. भंडारदरा व मुळा धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला. यामुळे धरणा मध्ये पाण्याची पुन्हा आवक वाढत आहे. कोतूळजवळ मुळा नदी १७५३ क्युसेक वेगाने वाहती होती.धरणात ६८ दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले.

नाशिक जिल्ह्यात पाऊसाचे प्रमाण कमी.

ऑगस्ट महिन्या नंतर महाराष्ट्र राज्यात परतीचा पाऊस सुरू होत असतो. त्यावेळी धरण पाणलोट क्षेत्रा मध्ये पाऊस कमी असतो. यामुळे धरणं भरण्यासाठी हाच महिना महत्वाचा मानला जातो. अद्याप पर्यंत नाशिक जिल्ह्यात बहुतांश धरणे भरली नसून नाशिक जिल्ह्यात विशेष असा पाऊस झालेला नाही. नाशिकमध्ये २६ मिलिमीटर, त्रिंबकेश्वर १९ मिलिमीटर , इगतपुरी येथे ४३ मिलिमीटर इतका पाऊस पडला. नाशिक जिल्ह्या मधील गंगापूर, दारणा, कडवा, पालखेड, मुकणे या धरणां मधील पाणीसाठा अद्याप तरी ८५ टक्क्यांच्या आत मध्येच आहे. ही धरणं भरण्याची सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत. याशिवाय गोदावरी नदी वाहती होत नाही. हेच नाशिक जिल्ह्यातील पाणी जायकवाडी धरणात जात असते. मराठवाड्याचे पाणीप्रश्न मिटवनारे हे जायकवाडी धरण आहे.

भंडारदराच्या पाणलोटात पावसाने पकडला जोर.

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणात मागील २४ तासा मध्ये १२५ दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाल आहे. भंडारदरा धरणाचा एकूण पाणीसाठा ९ हजार ७५७ दशलक्ष घनफूट म्हणजेच ८८.३८ टक्के इतका झालेला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास कायम राहिल्यास धरण लवकरच ९० टक्के इतके होण्याची शक्यता आहे.

मुळा धरण क्षेत्रात ही पाऊसास सुरुवात.

मुळा धरण पाणलोट क्षेत्रा मधील हरिश्चंद्र गड व परिसरात पावसाने जोर पकडला असल्याने कोतूळच्या जवळ मुळा नदीचा विसर्ग आज वाढला. २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणात १८ हजार ९३ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला असून मुळा धरण ६९.५८ टक्के भरले आहे.

निळवंडे धरणात ६६.४३ टक्के पाणीसाठा

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा या धरणातून ८३० क्युसेस इतक्या वेगाने  पाणी सोडण्यात आले असून हे पाणी निळवंडे धरणात जमा होत आहे. निळवंडे धरणतूनही ५०० क्युसेस इतक्या वेगाने पाणी सोडण्यात आलं आहे.  धरणात ६६.४३ टक्के पाणी आहे. आढळा (४९.२४), सीना (४४.२२), खैरी (१४.६२), विसापूर (३.३६) या धरणात इतका पाणी साठा आहे.

जायकवाडीत ५७.७९ टक्के पाणीसाठा

मराठवाड्या साठी महत्त्वाच्या व मोठ्या असलेल्या जायकवाडी या धरणाच्या परिसरातही काल १० मिलिमीटर इतका अत्यल्प पाऊस नोंदवण्यात आला. सध्या धरणात ५७.७९ टक्के पाणीसाठा आहे. त्यातील ४०.७७ टक्के साठा उपयुक्त आहे.

Leave a Reply

Don`t copy text!