खताच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ, दरवाढीमुळे बळीराजा आर्थिक संकटात

टीम कृषी योजना :
टीम कृषी योजना :
भारतात पेट्रोलच्या किमती अत्यंत झपाट्याने वाढत आहेत. इंधनाचे दर आकाशाला टेकले आहेत. पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्यावर गेलेले आहेत. मात्र असं असतानाही केंद्र सरकारनं सामान्यांना आणि विशेषतछ शेतकऱ्यांना आणखी एख मोठा धक्का दिला आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम भारत सरकारने केले आहे. देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढविण्याचं पाप भाजप सरकारनं केले असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ न करण्याचा आदेशाला खत कंपन्यांनी केराची टोपली दाखवली असून, खत कंपन्यांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी दरवाढ लागू केली आहे. कोरोना, लॉकडाउनमुळे शेतीमाल विक्री व्यवस्था कोसळून पडलेली असताना काही ग्रेडमध्ये गोणीमागे ५०० ते ७०० रुपये इतकी मोठी दरवाढ केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. मात्र जागतिक बाजारात कच्चा माल महागल्याने खतांच्या ‘एमआरपी’त वाढ करणे अपरिहार्य असल्याचा दावा खत उद्योगाने केला आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तुटावी म्हणून लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या लॉकडाऊनचा फटका बळीराजालाही बसत आहे. लॉकडाऊन असल्याने बाजार समित्या देखील बंद आहेत, त्यामुळे शेतमाल घरातच पडून आहे. दुधाच्या दरात देखील घसरन झाली आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात भरीसभर म्हणजे खतांच्या किंमतीमध्ये देखील मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याने यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी आर्थिक अडचणीचा ठरणार असल्याची शक्यता आहे.
वातावरण सुरळीत जरी असले तरी शेतकऱ्यांच्या समस्या मात्र कमी होत नाहीत. नैर्सगिक आपत्तीबरोबरच आता सरकारच्या निर्णयानेही शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण १२०० रुपयांमध्ये मिळणाऱ्या डीएपी खातांची गोणी आता १९०० रुपयांत मिळणार असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे. हवामान विभागाने यंदा पाऊस चांगला होणार असल्याचा अंदाज वर्तवला, त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाची लहर होती. पण खतांची किंमत वाढल्याने उत्पन्न खर्चात देखील वाढ होणार आहे, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
शेती परवडत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. पण सत्तेत आल्यानंतर मात्र वास्तविकता वेगळीच असल्याचं मत शेतकरी मांडत आहेत. शेतकरी आंदोलनाला पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला पण त्याकडे सरकार लक्ष देत नाही, आणि आता खतांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. डीएपी खताच्या बॅगेची किंमत 58 टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे, अशी व्याथा शेतकरी मांडत आहेत