Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

कृषिविभाग येणार शेतकऱ्यांची दारी ; सरकारची नवी योजना

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अनेक योजनांची माहिती नसल्याकारणाने योजनांचा लाभ मिळत नाही परंतु आता शेतकऱ्यांना कृषी संजीवनी मिळावी यासाठीचा शासनाकडून एक योजना ( अभियान ) हाती घेण्यात येत आहे.या अभियानातून कितपत लाभ मिळतो हा विषय वेगळा आहे. Agriculture department will come to the doorsteps of farmers; Government’s new plan

21 जुन पासून राज्यात कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ झाला असून त्याअंतर्गत बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, बीजप्रक्रीय, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर या संदर्भात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे.

गुरुवार दि. 24 जुन 2021 रोजी एक गाव एक कापूस वाण, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, ऊस लागवड तंत्रज्ञान, कडधान्य व तेल बीया क्षेत्रात आंतरपिक तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
25 जुन रोजी विकेल ते पिकेल, 28 जुनला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञानाचा प्रसार, 29 जुनला रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा पिक उत्पादक वाढीसाठी सहभाग, 30 जुनला प्रत्येक जिल्ह्यातील महत्वाच्या पिकांची किड व रोग नियंत्रण उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. 1 जुलैला कृषी दिनी मोहिमेचा समारोप होणार आहे.

दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. दि. 1 जुलैपर्यंत ही मोहिम सुरु राहणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Don`t copy text!