‘उत्तर महाराष्ट्रात’ ऑरेंज ऍलर्ट तर मराठवाड्यात जोरदार पाऊसाची शक्यता. ‘ या ‘ तारखेपर्यंत पडणार पाऊस. Orange alert in ‘North Maharashtra’ and heavy rain in Marathwada. It will rain till this date.
टीम कृषी योजना /Krushi Yojana
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.विदर्भामध्ये सर्वत्र सर्वदूर जोरदार पाऊस कोसळत असून बुधवार दि.18 ऑगस्ट रोजी ‘उत्तर’ महाराष्ट्रा मधील जळगाव, धुळे,नाशिक, नंदूरबारसह औरंगाबाद जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज’ ऍलर्ट जारी केला असून तसेच कोकण विभागातील रत्नागिरी,रायगड, पालघर, ठाणे, मुंबई व मराठवाड्या मधील जालना व बीड त्याच बरोबर विदर्भ पट्यातील वाशीम,बुलढाणा व अकोला अकोला या जिल्ह्यमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
मागील २४ तासा मध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून,शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
मंगळवार दि.17 ऑगस्ट रोजी कोकण मधील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड व रत्नागिरी या जिल्ह्या मध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रतील विविध भागात पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रा मधील नाशिक,नंदुरबार, धुळे व जळगाव या जिल्ह्या मध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच मराठवाड्या मधील औरंगाबाद तसेच जालना,बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाड्या मध्ये पुढीचे दोन दिवस सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
तसेच विदर्भा मधील अकोला, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये विविध भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्या मध्ये घाट माथ्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.