टीम कृषी योजना / Krushi Yojana
नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचा पाऊस अखेर पुणे जिल्ह्यात दाखल झाला आहे. Monsoon arrives in Pune district. मान्सून शनिवारी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून (Monsoon) राज्यभरात वेगाने आगेकूच करत आहे. मान्सूनचा सध्याचा वेग पाहता तो अपेक्षेपेक्षा लवकर संपूर्ण राज्य व्यापेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. (Monsoon Rain in Maharashtra )
राज्यातील बहुतांश शेतकरी हे शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात.पाऊसाच्या पाण्यावर केली जाणारी हंगामी शेतीचे प्रमाण मोठे आहे त्यामुळे मान्सूनच्या आगमनाने शेतकरी सुखावला आहे.
यावेळी कसे असेल पाऊसाचे प्रमाण .?
स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरीच्या BBM 6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.