Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

२० लाख रुपयांचा बनावट खतांचा साठा जप्त. ( चढ्या दराने केली जात होती विक्री. )

टीम कृषी योजना /krushiyojana

मान्सूनच्या पाऊसास सुरुवात होताच राज्यात खरिपाच्या पेरणीची लगबग पहावयास मिळत आहे,खते,बी-बियाणे,औषधे यांची जुळवाजुळव करण्यात शेतकरी गुंतला आहे,अनेक ठिकाणी खतांची समस्या जाणवत असताना काळ्या बाजारात चढ्या दराने खतांची विक्री करण्याचे प्रकार वाढत असताना असाच एक प्रकार समोर आला आहे.

सांगली मधील कृषी विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात 20 लाख 60 हजार रुपये इतक्या किमतीचा खतांचा साठा जप्त केला.(  Stocks of fake fertilizers worth Rs 20 lakh seized. )

ही महत्वाची योजना नक्की पहा – गाई व म्हैस गोठा अनुदान योजना 2021 | 77000 रुपये अनुदान मिळणार | असा करा अर्ज

ही महत्वाची योजना तुमचा फायदा करू शकते – मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 किती अनुदान | काय आहे योजना | कुठे करायचा अर्ज

 

हा खतांचा साठा बनावट असण्याचीही शक्यता आहे. यासंदर्भात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाअसून जप्त केलेली खते शेतकऱ्यांना आणि किरकोळ उत्पादकांना विनापरवाना विक्री केली जात होती.

शेतकऱ्यांना या खरीपाच्या हंगामात रास्त दराने खतं उपलब्ध करून द्यावीत अशा कृषी मंत्र्यांच्या व कृषी विभागाच्या सूचना आहेत. खत विक्रेत्यांनी काही ठिकाणी चढ्या दराने खत विक्री केल्याची तक्रार उपलब्ध झाली होती. कृषी विभागाच्या ११ भरारी पथकांनी यासंदर्भात गुप्तपणे माहिती जमा केली. जुना बुधगाव रोडवरील ग्लोबल इम्पोर्टस कार्यालयावर छापा घालून सुमारे 20 लाख 60 हजार रुपये किमतीचा बनावट खत साठा जप्त केला आहे. त्याची कोणतीही परवानगी कंपनीकडे उपलब्ध होऊ शकली नाही.कुठलेही कागदपत्र उपलब्ध नव्हते.

या छाप्या मध्ये फेरस सल्फेट, सल्फर, मॅग्नेशियम सल्फेट, बोरॉन, झिंक सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट ही खते भरारी पथकाकडून जप्त करण्यात आली असून या खतांच्या खरेदीची कुठलीही कागदपत्र या साठा करणाऱ्यांकडे नव्हत्या तसंच खतांची विक्री करण्यासाठी लागणारा परवानाही त्यांच्याकडे मिळून आला नाही. खतांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Leave a Reply

Don`t copy text!