टीम कृषी योजना/krushi yojana
हरियाणा राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना ७००० रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. ( The state government has announced financial assistance of Rs 7,000 to farmers in their state. )
ही योजना अशा शेतकऱ्यांना मिळेल जे आपल्या शेतात धान्य पिकाच्या उत्पादनाऐवजी कमी पाणी लागणारी जी पिके असतात अश्या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
आज पर्यंत प्राप्त माहितीवरून हरियाणा मध्ये एक लाख सव्वीस हजार नऊशे अठ्ठावीस ( १२६९२८ ) हेक्टरवर धान्य पिका व्यतिरिक्त इतर पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. धान्य पिकांव्यतिरिक्त इतर पिकांची लागवड व उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सात हजार ( ७००० ) रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल असे सरकारने घोषीत केले. या योजनेचे नाव आहे ‘ मेरा पाणी मेरी विरासत ‘
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी २५ जूनपर्यंत सरकारी पोर्टल वर मेरा पानी-मेरी विरासत योजनेची (Mera Pani Meri Virasat Scheme) नोंदणी करावी लागेल. तसेच शेतात वृक्ष लागवड शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी एक एकर क्षेत्रात 400 झाडे जर लावली असतील तर त्यांना सरकार कडून 10 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
‘मेरा पानी-मेरी विरासत” My water-my heritage’- ‘Mera pani meri virasat’ या योजनेचा फायदा घेण्यासाठी नेहमीच्या धान्य पिका ऐवजी मका व बाजरी हे कमी पाणी लागणारे पिकांची लागवड करावी लागणार आहे. या पिकांसाठी किमान हमीभाव दिला जाईल असे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले. तसेच या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा मोफत लाभ मिळेल.
‘ मेरा पानी-मेरी विरासत ‘ योजनेच्या सरकारी पोर्टलवर जाऊन शेतकऱ्यांना आपण किती एकरात पीक घेतले आहे याची माहिती नमूद करायची आहे त्याबाबत ची अधिकृत नोंद असलेली कागदपत्र असणे गरजेचे आहे.त्यानंतर या माहितीची पडताळणी होईल. योजनेस पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल.
राज्य सरकारच्या या निर्णया नंतर हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील ढाकला या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत असा निर्णय घेतला आहे की ते सर्व जण यंदा पाणी जास्त प्रमाणात लागणाऱ्या पिकांची शेती न करण्याचा निर्णय घेतला.
अशीच एखादी योजना महाराष्ट्र सरकारने देखील सुरू करावी या द्वारे पाण्याची बचत व शेतकऱ्यांना देखील योजनेत सहभागी होता येईल.