Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

हवामान विभागाने दिला महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाचा इशारा ; या तारखेनंतर सुरू होणार पाऊस.

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

नैऋत्य मोसमी पाऊसाचे यंदा लवकर आगमन झाले,राज्यात काही तालुक्यात पेरनी योग्य पाऊस झाला परंतु अनेक गावे व तालुके आजही पाऊसाचा प्रतीक्षेत आहेत,पाऊसामुळे शेतीची अनेक कामे खोळंबली असल्याने शेतकरी चातकासारखी पाऊसाची वाट बघतोय.

महाराष्ट्रातील काही विभाग, पश्चिम बंगाल, ओडिसा, कर्नाटक, आंध्रमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. उत्तरेच्या राज्यामध्ये पाऊसाचे वातावरण निर्माण झाले आहे, आकाशात ढग गोळा होत आहे काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागानुसार देशातील काही राज्यांमध्ये मान्सून पुढे सरकत आहे.( Meteorological Department warns of torrential rains in Maharashtra; It will start raining after this date. )

देशातील काही राज्यांत बंगालच्या खाडीवर तयार झालेल्या कमीदाबाच्या पट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.भारतीय हवामान विभागाच्या Indian Meteorological Department अंदाजानुसार मान्सूनचा २७ जूननंतर जोर धरेल.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात पश्चिम किनार पट्टीवरील पश्चिमी हवेमुळे वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू होईल. भारतीय हवामान विभागाने त्यांच्या जूनच्या शेवटच्या आठवड्यातील अंदाज पत्रकात म्हटल आहे की, मान्सूनच्या पाऊसाची प्रगती 27 जूनपासून 30 जून या कालावधीत जोर धरेल.

पश्चिम बंगाल व शेजारच्या भागात एक निर्माण झालेले वातावरण पावसाचे कारण आहे. येत्या दोन-तीन दिवसात बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्किम व उत्तर ओडिसामध्ये मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Leave a Reply

Don`t copy text!