हवामान तज्ञ ‘पंजाब डख’ यांचा नवा हवामान अंदाज | 15 जून ते 22 जून | संपूर्ण महाराष्ट्र अंदाज.

 

टीम कृषी योजना/krushi yojana

हवामान अंदाज ,पाऊसाचा अंदाज या बाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले हवामान तज्ञ पंजाब डख यांनी या महिन्यातील 15 जून ते 22 जून पर्यंतचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज वर्तविला आहे. आपण बघुयात शेतकरी बांधवांना काय सांगितले आहे पंजाब डख यांनी. ( Punjab Dak’s new weather forecast | June 15 to June 22 | All Maharashtra forecast )

15 ते 22 जून या दरम्याण महाराष्ट्र राज्यात भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाउस पडेल व पेरणी होइल. पेरणी करण्यासाठी स्वःत जमिनीतील ओल पाहूण निर्णय घ्यावा असे पंजाब डख सांगतात.

पूर्व -विदर्भ , प-विदर्भ ,मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, कोकन पट्टी ,प-महाराष्ट्र
या विभागातील पेरणी होईल असा अंदाज वर्तविला आहे. राज्यातील एखाद्या जिल्हातील एखादा भाग सुटेल तर उत्तर महाराष्ट्रात पेरणी करण्यासाठी वाट पहावी लागेल. पंजाब डख सांगतात की 2009 साली मान्सून पूर्वेकडून आला होता .त्या वेळी उत्तर महाराष्ट्राची पेरणी उशीरा झाली होती.असे झाले तर उर्वरीत विभागात खूप मुसळधार पाउस पडतो तळे पूर्ण क्षमतेने भरतात.

शेतकऱ्यांनी 1 फुट खोल ओल गेली तरच पेरणी करावी. या पावसावर काही भागातील बळीराजाची पेरणी होइल असे पंजाब डख संगतात.

उत्तर महाराष्ट्रात पेरणी उशिरा होईल.

राज्यातील मान्सून यंदा पूर्वे कडून आल्यामुळे विदर्भ मराठवाडा या भागातील पेरणी सुरवातीला पूर्ण होइल तर उत्त्तर महाराष्ट्राला पेरणी साठी या हंगामात विलंब होऊ शकतो.

वरील सर्व अंदाज विभागानुसार वर्तविण्यात आले असून गाव निहाय नाहीत. दिलेल्या तारखेत एक दिवस मागे पुढे होऊ शकतो. वाऱ्याच्या बदलानूसार पाउस पडत असतो असे पंजाब डख यांनी सांगितले.

वरील अंदाज हे 15 ते 22 जून पर्यंत आहेत शेतकरी बांधवांनी सद्य परिस्थिती नुसार पेरणी व शेती कामे करावीत. आम्ही पंजाब डख यांचा अंदाज आपल्या पर्यंत वर्तवला आहे.

Leave a Reply

Don`t copy text!

Discover more from krushiyojana.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading