टीम कृषी योजना / Krushi Yojana
पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना जिल्ह्यात 2021-22 या वर्षात राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पीक संत्रा विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर भरावयाचा पीकविमा हप्ता 4 हजार रुपये इतका आहे. विमा हप्ता जमा करण्याची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत आहे.( Weather Based Fruit Crop Insurance Scheme 2021 – 22 )
अहमदनगर जिल्ह्यातील या मार्केटला झाली राज्यात सर्वाधिक कांदा आवक.
मोसंबी पिकासाठी विमा हप्ता प्रती हेक्टर 4 हजार रुपये आहे. हा विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 30 जून आहे. पेरू या फळ पीकासाठी विमा हप्ता 3 हजार रुपये निश्चित करण्यात आला असून विमा हप्ता जमा करण्यासाठी अंतिम मुदत 30 जूनपर्यंत आहे. चिकू या पिकासाठी 3 हजार रुपये विमा हप्ता दर निश्चित करण्यात आला आहे. विमा हप्ता जमा करण्याची अंतिम मुदत 30 जुन पर्यंत देण्यात आली आहे. डाळिंबासाठी प्रती हेक्टर विमा हप्ता 6 हजार 500 रुपये असून 14 जुलैपर्यंत हप्ता जमा करण्यासाठी मुदत आहे. सिताफळ या पिकासाठी 2750 रुपये हफ्ता भरावा लागणार आहे,अंतिम मुदत 31 जुलै असणार आहे.
लिंबू या पिकासाठी 3 हजार 500 रुपये विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. 30 जूनपर्यंत विमा हप्ता जमा करण्याची मुदत आहे.
या फळपीक विमा योजनेत हफ्ता भरण्यासाठी 7/12 व 8 अ उतारा,आधारकार्ड झेरॉक्स,बँक पासबुक झेरॉक्स,स्वयं घोषणपत्र,फळबागेचा जिओ टॅगिंग फोटो आवश्यक असणार आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय किंवा गावातील कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक किंवा बँकेत संपर्क साधून माहिती घेऊ शकता.
फळपीक विमा योजनेचा हफ्ता भरण्यासाठी नजीकच्या सेतू कार्यालय अथवा आपले सरकार केंद्रात हफ्ता भरू शकता.
ही महत्वाची योजना नक्की पहा – पीएम किसान योजनेतून ४ हजार रुपये मिळवण्याची संधी | हे शेतकरी घेऊ शकतात फायदा.