टीम कृषी योजना/ Krushi Yojana
खरिपाचा हंगाम सुरू झाला आहे,शेतकऱ्यांनी खते,बियाणे,शेती औजारे यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. शेतकऱ्यांची खते मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात खतांची तीव्र टंचाई आहे.असे असताना युरिया खताचा बफर स्टॉक करून ठेवला जात आहे. आतापर्यंत एकूण साडेपाच हजार टन युरिया खत साठवून ठेवले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. शेतकऱ्यांची मात्र विक्रेत्यांकडे युरिया देण्यासाठी मागणी केली जात आहे. त्याचाच फायदा घेऊन काही ठिकाणी लिंकिंग करून तर काही ठिकाणी चढ्या दराने खताची विक्री केली जात असल्याचे चित्र दिसत आहे,शेतकरी बोलत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात या खरीप हंगामात पावणे सात लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होण्याचा अंदाज आहे.याच दृष्टीने कृषी विभाग नियोजन करत असतो.
अहमदनगर जिल्ह्यात घेतले जाणारे प्रमुख पीक बाजरी, सोयाबीन,कपाशी उत्पादक शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी जास्त असते. खरिपाच्या पेरणीस अनेक भागात सुरूवात झाली असून, खते, बियाणे खरेदीसाठी दुकानांवर गर्दी दिसत आहे. दरवर्षी प्रमाणेच अधिक मागणी असलेल्या युरिया खताची यंदाही अनेक भागात टंचाई जाणवत आहे.
जमिनीच्या ‘सात बारा’ मध्ये होणार ‘हा’ मोठा बदल – महत्वाची माहिती नक्की वाचा
अहमदनगर जिल्ह्यात एकूण युरियाची १ लाख ६ हजार ८६९ टन मागणी केलेली असताना, ८१ हजार ९१० टन खत पुरवठा करायला मंजुरी मिळाली आहे.त्यापैकी ४५ हजार १९३ टन पुरवठा झालेला आहे. त्यातील ३२ हजार २०३ टन खताची विक्री झाली असून ११ हजार ९९० टन युरिया शिल्लक असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. युरिया खताची मागणी वाढत असताना निर्माण झालेली टंचाई व त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून युरिया पुरवठा करण्यासाठी युरियाचा बफर स्टॉक करण्याला शासनाची परवानगी आहे.
२० लाख रुपयांचे बनावट खते. या ठिकाणी सुरू होती विक्री – वाचा सविस्तर
अहमदनगर जिल्हात युरियाची टंचाई असतानाही कृषी विभागाने युरियाचा बफर स्टॉक केला जात आहे. आतापर्यंत सुमारे साडेपाच हजार टन खत स्टॉकमध्ये साठवून ठेवले आहे. ८ हजार १० टनापर्यंत युरिया खत साठवून ठेवण्याची परवानगी असल्याचे अधिकारी सांगत आहेत. खते, बियाणांचा काळाबाजार किंवा चढ्या भावाने विक्री होऊ नये यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर भरारी पथके कार्यरत आहेत. तरीही सर्रासपणे युरिया सोबत इतर खते घ्यावी लागत आहेत. दरवर्षीच निर्माण होणारी ही टंचाई शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणते यासाठी खरीप हंगामाच्या पूर्वी नियोजन होणे गरजेचे असते परंतु ते होताना दिसत नाही.