टीम कृषी योजना / Krushi Yojana
नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) (Mansoon) चा जुलै (July) महिन्यातील अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जुलै महिन्या मध्ये ९४ ते १०६ टक्के पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा ( IMD ) अंदाज आहे. देशातील विविध भागात सरासरीच्या कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.( Rainfall forecast for the entire month of July; See how much rain will fall )
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी असे सांगितले आहे की,
जुलै महिन्या मध्ये देशभरात ९४ ते १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यांसह पूर्व भारत, दक्षिण भारतातील अनेक भागात पाऊसाचे प्रमाण सरासरी इतके राहील. मध्य भारता मध्ये सरासरी प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज आहे.
महाराष्ट्रा मध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा आणि विदर्भ भागाच्या काही भागांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी किंवा सरासरीच्या बरोबरीत पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नैऋत्य मोसमी वारे ( मॉन्सून Mansoon ) राज्यात दाखल झाल्यावर कोकण व विदर्भ वगळता राज्यभरात पाऊसाचे प्रमाण अत्यल्प आहे. राज्यभरात पावसाचा जोर वाढण्यास आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे. कोकण विदर्भ व महाराष्ट्रात चांगल्या पाऊसाची अपेक्षा आहे. लवकरच पाऊस होईल असा अंदाज आहे.