शेती पीक कर्जात मोठी वाढ | तुमच्या पिकाला किती पीक कर्ज मिळणार | Crop loan New rates | वाचा सविस्तर

Advertisement

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

Advertisement

शेती ही निसर्गावर अवलंबून झाली आहे,वेळेवर पाऊस झाला तर चांगलं उत्पन्न मिळत परंतु अनेकदा शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करावाच लागतो. अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यामुळे आर्थिक गणित कोलमडून जाते.अश्या वेळी शेतकरी बँकेचा आधार घेऊन पीककर्ज घेतात परंतु वेगवेगळ्या पिकांना कर्ज कमी जास्त प्रमाणात दिले जाते. या संकटांचा सामना करताना शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडत असताना. शेतकरी पीककर्जापासून दरवर्षी वंचित राहतात. अशा स्थितीत बँकांद्वारे अल्प व्याजदरात (Crop Loan) कर्ज उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे कार्य सरकार करीत असते. परंतु अनेक बँकाच्या किचकट व वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.( Increase in agricultural crop debt | How much crop loan will your crop get? Crop loan New rates | Read detailed)

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेमुळे गेल्या वर्षी मात्र मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्ज मुक्त झाले व नवीन कर्ज मिळण्यासाठी पात्र झाले.
यामुळे मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून (Crop Loan) पीककर्ज वितरित केले गेले.
वर्षी पीक कर्जाचे दर निश्चित करताना राज्यस्तरीय समितीने कर्ज वितरण व त्याचे नियोजन करताना पिकाचे दर निश्चित केले आहेत. यंदा अनेक पिक निहाय ३ ते ४ हजार रुपयांची वाढ केली गेली आहे.

Advertisement

कुठल्या पिकाला एकरी व हेक्टरी किती कर्ज मिळतंय पहा

१ – ऊस

१३२००० रुपये प्रति हेक्‍टर
५२००० हजार रुपये प्रती एकर

Advertisement

२ – तुर बागायती 

४० हजार रुपये प्रति हेक्‍टर
१६ हजार रुपये प्रती एकर

Advertisement

३ – कापूस जिरायती 

५२ हजार रुपये प्रति हेक्‍टर
२० हजार ८०० रुपये प्रति एकर

Advertisement

४ – कापूस बागायती 

६९ हजार रुपये प्रति हेक्‍टर
२७ हजार ६०० रुपये प्रति एकर

Advertisement

४ – सोयाबीन 

४९ हजार रुपये प्रति हेक्‍टर
१९ हजार रुपये प्रति एकर

Advertisement

५ – कांदा

६५ हजार रुपये प्रति हेक्‍टर
२६ हजार रुपये प्रती एकर

Advertisement

६ – मुग

२० हजार रुपये प्रति हेक्‍टर
८ हजार रुपये प्रती एकर

Advertisement

७ – खरीप ज्वारी

२७ हजार रुपये प्रति हेक्‍टर
१० हजार ८०० रुपये प्रती एकर

Advertisement

८ – बाजरी

१८ हजार रुपये प्रति हेक्‍टर
६४०० रुपये प्रती एकर

Advertisement

९ – मका

३० हजार रुपये प्रति हेक्‍टर
१२ हजार  रुपये प्रती एकर

Advertisement

असे पिककर्जासाठी सुधारित दर आहेत,शेतकरी बांधवांनी नवीन दराप्रमाणे पिककर्जाची मागणी करावी.

वरील माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा. व्हॉट्सअप ,फेसबुक वर शेअर करा.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker