Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

शेतीमालाच्या हमीभावासाठी विक्री व्यवस्थानास बळकटी देणार | ठाकरे सरकारचा निर्णय

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर स्व.बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेच्या माध्यमातून शेतीमालास योग्य हमीभाव मिळण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर विक्री व्यवस्थापन व्यवस्थेला बळकटी देणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

मान्सूनच्या पाऊसास होणार सुरुवात ; पोषक वातावरण झाले निर्माण. जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता ; हवामान विभाग

कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले, की बळीराजा शेतात कुटुंबासह कष्ट करतो.त्यां शेतकऱ्याची व कुटुंबाच्या प्रगतीच्या दृष्टीने ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत बाजारातील मागणीनुसार शेतकऱ्यांनी शेतात पीक घ्यावे असे मत व्यक्त केले.

यामुळे उत्पन्न वाढीस योग्य हमीभाव मिळेल तसेच शेतकरी ते थेट ग्राहक या दृष्टीने विक्री व्यवस्थापन बळकट करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर एक धोरण निश्चित केले जाणार आहे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी बीड मॉडेल सादर करण्यात आले आहे. द्राक्ष व सीताफळ या पिकांना विमाकवच देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या कालावधीत शेतकरी, फार्मर प्रोड्युसर कंपनी व शेतीमाल प्रक्रिया उद्योजक यांच्या सहभागाने महाराष्ट्रव्यापी एकदिवसीय ऑनलाइन शिबिर होणार आहे.

27 शासकीय योजना | 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल

या आयोजित कार्यशाळेत ५३ शेतीगटांचा सहभाग होता. ५३ शेतीगटांनी शेतमाल प्रदर्शनाद्वारे सहभाग घेतला होता. भुसे यांच्या हस्ते ‘विकेल ते पिकेल’ पोस्टर , संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान, पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग निर्दीष्टीकरण योजना या घडीपत्रिकांचे प्रकाशन करण्यात आले. व्हिडीओ कॉन्फरसींग च्या माध्यमातून शेतकऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले.

1 thought on “शेतीमालाच्या हमीभावासाठी विक्री व्यवस्थानास बळकटी देणार | ठाकरे सरकारचा निर्णय”

Leave a Reply

Don`t copy text!