टीम कृषी योजना / Krushi Yojana
जिल्हा परिषदेच्या अकोल्याच्या कृषी विभागामार्फत सेस फंडातून राबवित येत असलेल्या योजनांच्या साठी शेतकऱ्यांकडून 31 जुलैपर्यंत विहित नमुन्या मध्ये अर्ज मागविण्यात आले आहेत.या योजनेतून शेतकरी बांधवांना 90 टक्के अनुदान उपलब्ध असणार आहे.या अनुदानावर शेती उपयोगी साहित्य व अवजारे मिळतील.(Farmers will get agricultural implements on 90% subsidy)
अकोला जिल्हा परिषदेच्या वतीने सेस फंडातून शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग मार्फत विविध प्रकारच्या योजना राबवित आहे.या योजनेमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ताडपत्री पुरविण्याच्या योजनेसह 90 टक्के अनुदानावर उपलब्ध होणाऱ्या योजनांचा समावेश आहे.चालू आर्थिक वर्ष 2021 – 22 मध्ये देखील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर या योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने मंजुरी दिली होती व सेस फंडातून निधीची मागणी त्यांनी केली होती.त्याप्रमाणे या वर्षासाठी अकोला कृषी विभागाने या योजना राबविण्याच्या साठी शेतकऱ्यांकडून 14 जुलै ते 31 जुलैपर्यंत जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये पंचायत समिती मधून अर्ज मागवण्यात आले आहे.यामुळे शेतकऱ्यांना पंचायत समितीमध्ये विहित नमुन्यामध्ये हा अर्ज करायचा आहे.
या आहेत योजना व मिळनारे अनुदान
सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर एचडीपीई पाईप पुरविणे.
सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर सोयाबीन स्वच्छ करण्यासाठीचे स्पायरल सेपरेटर, ग्रेडर पुरविणे.
सर्वसाधारण गटामधील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड पॉवर स्प्रेअर पुरविणे.-
सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर प्लास्टीक ताडपत्री 450 जीएसएम पुरविणे.
Jilha Parishad Yojana Jilha Parishad Anudan Zp Scheme
Very Helpful Information