शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ! शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून जमा होणार 2 हजार रुपये

Good news for farmers! Rs 2,000 will be credited to farmers’ accounts from tomorrow, Rs 19,000 crore will be released by the Center.

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या आठव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कृषी मंत्रालयाने या बाबत दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी म्हणजेच शुक्रवारी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

यानंतर तातडीने पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे. या कार्यक्रममध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.याबाबत आपण pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना आठव्या हप्त्यामध्ये 2 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 19 हजार कोटी रुपये वर्ग करतील.

पीएम किसान PM KISAN योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 7 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना 14 हजार मिळाले आहेत. ( Prime Minister Narendra Modi will released the eighth instalment of PM Kisan Yojana on 14 May)

10 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ.

पंतप्रधान किसान सन्मान PM KISAN निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. प्रथम हफत्यावेळी 3 कोटी 16 लाख 05 हजार 539 शेतकर्‍यांना दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळाला होता. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 कोटीहून अधिक शेतकर्‍यांची नोंदणी केली आहे. डिसेंबर 2020 मध्ये जाहीर केलेला हप्ता 10 कोटी 70 हजार 978 शेतकऱ्यांना देण्यात आला होता. आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जुलैच्या हप्त्यात जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. यावेळी केंद्र सरकारने एकूण 10 कोटी 48 लाख 95 हजार 545 शेतकर्‍यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठविले होते.

Leave a Reply

Don`t copy text!

Discover more from krushiyojana.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading