कृषी सल्ला

शेतकऱ्यांना आनंदवार्ता ; अहमदनगर जिल्ह्यातील या धरणांमध्ये 60 टक्के पाणीसाठा .

शेतकऱ्यांना आनंदवार्ता ; अहमदनगर जिल्ह्यातील या धरणांमध्ये 60 टक्के पाणीसाठा .( Good news to farmers; These dams in Ahmednagar district have 60 per cent water storage.)

टीम कृषी योजना / Krushi Yojana

गेल्या तीन चार दिवसांपासून धरणक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जीवनदायिनी असलेले भंडारदरा व मूळा धरणात मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक होत असून भंडारदरा धरण 60 टक्के तर मुळा धरण 46 टक्के इतके भरले आहे. गुरुवार पासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाऊसाची संततधार सुरू असून धरणामध्ये नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या दमदार पाऊसामुळे धरणात पाणी मोठ्या प्रमाणात दाखल होत असून, पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. भंडारदरा व मुळा धरण पाणलोट क्षेत्रात हा पाऊस जोर धरत असून सर्व ओढे – नाले खळखळून वाहत आहेत.हे सर्व पाणी मुळा व प्रवरा नदीद्वारे धरणामध्ये येत आहे.यामुळे भंडारदरा व मुळा धरणांत पाण्याची आवक वाढत आहे. भंडारदारा पाणलोट क्षेत्रा मधील घाटघर, पांजरे, उडदावणे, साम्रद या भागात काही दिवसांपासून पाऊस जोर पकडत आहे.पाऊसाची संततधार सारखी सुरू असल्याने पाण्याची आवक वाढत आहे. भंडारदरा धरणात 6626 दशलक्ष घनफुट इतका पाणीसाठा झाला आहे.

कळसूबाई शिखर तसेच जहागीरदारवाडी व बारी परिसरात पावसाचा जोर कमी झाला असल्याने कळसूबाई शिखरा वरून वाहणारी कृष्णावंती नदीचा प्रवाह कमी आहे. या नदीवरील ‘वाकी बंधारा’ अजूनतरी भरला नाहीये.’वाकी बंधारा’ भरल्यावरच निळवंडे धरणात नवीन पाण्याची आवक होणार आहे. सध्या भंडारदरा धरणा मधून विद्युतनिर्मिती साठी जे पाणी सोडले जात आहे तेवढेच पाणी निळवंडे धरणात येत आहे. मुळा धरणामध्ये पाणीसाठा 11 हजार 848 दशलक्ष घनफूट इतका झाला असून, धरणात 4705 क्युसेस इतकी आवक होत आहे. मुळा धरण 46 टक्के भरले आहे. मुळा धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून, गुरुवार दि.22 जुलै रोजी दिवसभर पाणलोट क्षेत्रात ढगाळ वातावरण होते तर पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत पडत आहेत.गेल्या काही दिवसांपासून पाऊसाच्या सरी मुळा धरण क्षेत्रावर टिकून असून यामुळे धरणात आवक टिकून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!