Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

शेतकरी पुन्हा उतरणार रस्त्यावर, १७ जूनला राज्यभर मोर्चे

 

टीम कृषी योजना/krushi yojana

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्यभर लॉकडाऊन लावला गेला होता याचाच फायदा घेऊन अनेक दूध संघांनी दुधाचे भाव कमी केले (पाडले) असा आरोप दूध उत्पादकांनी केला आहे.याच्याच निषेधार्त राज्यभर पुन्हा आंदोलन पुकारले गेले असून. यासाठी तारीख देखील निश्चित झाली असून या महिन्यातील १७ जून रोजी राज्यभरातील सर्व तहसिल कार्यालयावर मोर्चे काढण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला असल्या बाबतची माहिती भारतीय किसान सभेचे सरचिटणीस व शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.

महत्वाची योजना नक्की पहा – पैसे नसले तरीही जमीन खरेदी करू शकता | या योजनेद्वारे व्हा जमिनीचे मालक.

या आंदोलना बाबत माहिती देताना डॉ.नवले यांनी सांगितले. लॉकडाउनच्या काळात दुधाची मागणी कमी झाल्याचे कारण देत खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर तब्बल दहा ते पंधरा रुपये प्रति लिटरने कमी केले.खेडेगाव व शहरातील ग्राहकांना असलेले विक्रीदर मात्र जैसे थे ठेवत दूध उत्पादक शेतकरी व ग्राहकांची लूट केली जात आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने याविरोधात राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.नैऋत्य मान्सूनचे आगमन झाले आहे, खरीप हंगामाची कामे देखील सुरू झाली आहे.असे असताना राज्य सरकारने हंगामाच्या तयारीकडेही अक्षम्य दुर्लक्ष चालवले आहे, शेतकऱ्यांना आत्तापासूनच खतांची तीव्र टंचाई भासू लागली आहे. अनेक ठिकाणी खतांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.वाजवी दराने खते विकत घ्यावी लागत आहेत तर अनेक ठिकाणी खतांचे लिंकिंग केले जात असल्याची बाब समोर आली आहे. केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोल आणि गॅसचे दर प्रचंड प्रमाणात वाढवले आहेत. कोरोना काळात आलेली मोठं मोठी विजबिले भरणे अशक्य होत आहे.सर्वच बाजूंनी शेतकरी मेटाकुटीला आला आहे. केंद्र व राज्य सरकारचे या प्रश्नांकडे लक्ष वेधून तातडीने कारवाई होण्यासाठी १७ जून रोजी राज्यभरातील सर्व तहसिल कार्यालयांवर मोर्चे काढत निदर्शने करण्याचा निर्णय किसान सभेच्या राज्य काउन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे नवले यांनी सांगितले.

महत्वाची माहिती नक्की वाचा – पिक विमा मंजूर झाला की नाही पहा तुमच्या मोबाईल वर | सोपी पद्धत | बँकेत,कृषी कार्यालयात जाण्याची गरज नाही.

राज्यभरातील तहसील कार्यालयांवर कोरोनाचे नियम पाळत करण्यात येत असणाऱ्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी केले आहे.

Leave a Reply

Don`t copy text!