लवंगी मिरचीने आणली तरुणाच्या जीवनात गोडी. 15 गुंठे मिरची पिकात कमवले तब्बल 3 लाख रुपये.

 

टीम कृषी योजना /Krushi Yojana 

शेती व्यवसाय म्हटले की प्रत्येक पीक तोट्यातच असे जणू काही समीकरणच हल्ली झाले आहे काबाडकष्ट करूनही शेतीतून गुजराण होत नाही म्हणून तोट्यातला व लहरी व्यवसाय म्हणून शेतीकडे पाहिले जाते.त्यातच सलग दोन वर्षांपासून आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे तर शेतीचे पुरते अर्थकारण कोलमडले आहे.कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ , सातत्याने येणारी रोगराई यामुळे शेती व्यवसाय करण्यास आजकाल तरुण धजावत नाही. जिद्द ,जोडीला कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल तर काही गुंठे क्षेत्रातही लाखो रुपये शेतीतून कमावता येतात हे बेलपिंपळगाव ता नेवासा जि- अहमदनगर येथील तरुण शेतकरी महेश सकाहारी शिंदे यांनी दाखवून दिले.

ही माहिती नक्की वाचा – किसान क्रेडिट कार्ड द्वारे कर्ज प्रक्रिया झाली अगदी सोपी | 3 लाखांचं कर्ज अल्प व्याजदरात मिळणार

30 जाने 2021 मध्ये महेश शिंदे यांनी 15 गुंठे क्षेत्रात पॉलीमल्चिंगच्या सहाय्याने शिवगामीनी मिरचीची लागवड केली.सदर मिरची पिकास रासायनिक खत देण्याऐवजी घरच्या गाईंच्या गोठ्यातील गोमूत्र व शेणखत व इतर जैविक घटक एकत्रित करून तयार झालेले जिवामृत ठिबक सिंचनद्वारे मिरीची पिकाला दिले त्यामुळे मिरची झाडांची जोमदार वाढ झाली व मिरचीच्या झाडांना मिरच्याही भरपूर आल्या सदर मिरची दिसण्यास आकर्षक व चवदार चविष्ट असल्याने बेलपिंपळगाव,टाकळीभान, नेवाश्यासह संपूर्ण नगर जिल्ह्यात या लवंगी मिरचीस घरगुती वापरासह हॉटेलमध्ये व मसाल्याचे पदार्थ बनवण्यासाठी ग्राहकांची मोठी पसंती आहे.लॉकडाऊन असल्याने काही ठिकाणी मिरची विक्री करण्यासाठी काही ठिकाणी अडचणी आल्या मात्र ग्राहकांची मागणी व गुणवत्तापूर्ण माल यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करत दररोज 100 किलो ताजी मिरची प्रति 60 रु किलो ने विक्री केली यातून दररोज 5 ते 6 हजार रू मिळतात यामधून तोडणी व इतर वाहतूक खर्च जाता प्रतिदिन 3500 ते 4000 रु निव्वळ नफा राहिला असे महेश शिंदे यांनी सांगितले.गेल्या तीन महिन्यात त्यांनी तब्बल 3 लाख रुपयांच्या मिरचीची विक्री केली त्यात त्यांना 2 लाख ते 2.5 लाख रुपये निव्वळ नफा राहिला तसेच अजूनही सुमारे एक महिने मिरचीची विक्री होईल त्यात 70 ते 80 हजार रुपये मिळतील अशी शिंदे यांना अपेक्षा आहे.शालेय शिक्षणानंतर नोकरी व्यवसाय न करता वाड वडिलांनी वाढविलेला शेतीचा व्यवसाय आवडीने तंत्रशुद्ध पध्दतीने व रासायनिक खत मुक्त करत करण्याचा निर्णय घेतला यात संपूर्ण कुटुंबाची साथ मिळाली व त्यामुळेच प्रयोगशील शेती करू शकलो असे महेश शिंदे म्हणाले तसेच आधुनिक शेती व्यवसाय करत असताना मा ना शंकरराव गडाख मृद व जलसंधारण मंत्री व प्रशांत गडाख अध्यक्ष यशवंत सामाजिक प्रतिष्ठान यांची नेहमी अडचणीच्या प्रसंगी साथ लाभते व प्रशांत गडाख यांनी गेल्यावर्षी बेलपिंपळगाव येथील शेतात येऊन केलेल्या नावीन्यपूर्ण शेती प्रयोगांचे कौतुक केल्याचे महेश शिंदे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती – कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता ; या कारणामुळे होऊ शकते वाढ

शेतीची आवड असणाऱ्या व शेती व्यवसायात उतरून नवनवीन प्रयोग करू इच्छिणाऱ्या तरुणांना महेश शिंदे बेलपिंपळगाव यांनी घालून दिलेल्या आदर्श शेतीचा प्रयोग निश्चितच प्रेरणादायी असा व शेतीची रुची वाढविणारा आहे यातून तरुण प्रेरणा घेत शेती करतील हेच महेश शिंदे यांच्या आदर्श व प्रयोगशील शेतीचे यश आहे.

Leave a Reply

Don`t copy text!

Discover more from krushiyojana.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading