राज्यात मान्सून होतोय लवकरच सक्रिय ; शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

Advertisement

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

Advertisement

राज्यात मान्सूनचे(Mansoon) आगमन झाल्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे राज्यात अनेक भगत पूर परिस्थिती निर्माण झाली. मान्सूनचे आभाळ व पाऊसाची शक्यता दिसताच शेतकर्‍यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली. त्या नंतर लांबलेला मान्सून आठवड्याभराने पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहे. या आठवड्यात आठ ते नऊ जुलै दरम्यान पावसाचे पुनरागमन होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.(Monsoon in the state soon becoming active)

हवामान विभागाच्या माहिती नुसार, येत्या पाच दिवसात चांगल्या पावसाची शक्यता आहे. 7 आणि 8 जुलै दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज वर्तविला असून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व पूर्व विदर्भ या भागांमध्ये 7 व 8 तारखेला ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊसाची हजेरी लागेलं, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Advertisement

शेतकरी बांधवांनी पावसाचा अंदाज घेत पेरणी करावी अशी माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने(Indian Meteorological Department) ही माहिती दिली असून या विभागातील वैज्ञानिक व मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट द्वारे हवामानाबद्दलची माहिती दिलीये.

त्यांच्या पूर्व अनुमाना नुसार, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील कोकण विभागात म्हणावं तसा पाऊस झाला नाही. मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागा मध्ये पाऊस पडू शकतो. 2 ते 8 जुलै दरम्यान या आठवड्यात विदर्भ तसेच मराठवाड्याच्या अन्य काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पाऊसाचे प्रमाण कमी असेल व 9 ते 15 जुलैच्या आठवड्यात हे प्रमाण वाढण्याची शक्यता देखील आहे. दरम्यान या दिवसात राज्यात सर्वदूर पाऊस पडू शकेल व कोकण विभागातही पावसाचा वेग वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Advertisement

Mansoon Alert Maharashtra ,Indian Meteorological Department

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page