टीम कृषी योजना / Krushi Yojana
शेतकरी ज्यांच्या हवामान अंदाजाची आतुरतेने वाट बघत असतात असे हवामान अभ्यासक पंजाब डख(Panjab Dakh ) यांचा पुढील आठवड्याचा म्हणजेच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील हवामान अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख (Meteorologist Punjab Dak ) यांनी वर्तविला असून. या अंदाजानुसार राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडणार असा कयास आहे.
पंजाब डंख यांचा हवामान अंदाज
राज्यात 6 ते 14 जुलै दरम्याण धो-धो सर्वदूर पाउस पडणार आहे.1 जुलै पासून ते 5 जुलै पर्यत हवामान कोरडे राहील.परंतु स्थानिक वातावरण तयार होऊन कोरडे हवामान सांगीतले तर तुरळक भागात दुपारनंतर अर्धा तासाचा पाउस होतो माहीत असावे.
या आठवड्यात सांगितलेल्या पाऊसाच्या अंदाजानुसार सर्तक रहावे- ओढे ,नदी,नाले वाहतील, छोटी छोटी तळे भरतील असा पाउस पडेल असा अंदाज पंजाब डख यांनी वर्तविला आहे
शेतकऱ्यांच्या माहितीस्तव –
राज्यात 6 जुलै पासून सर्वदूर पाऊस पडेल काही ठिकाणी मुसळधार तर कुठे वाहूनी पाऊस होईल तर कुठे अतिवृष्टी होईल तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस होईल. पुढील नऊ दिवसामध्ये दररोज भाग बदलत पडणार आहे. या पावसावर राहीलेली पेरणी होईल. शेतकऱ्यांनी सर्तक रहावे व स्वतःची व पाळीव प्राण्याची,जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन पंजाब डख( Panjab Dakh ) यांनी केले आहे.
पूर्वविदर्भ
मराठवाडा
प.विदर्भ
दक्षिण महाराष्ट्र
प.महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
कोकन पट्टी
हे ही वाचा..
उन्हाळी कांद्याच्या भावात का होत आहे घसरण.? भाव वाढण्याची शक्यता आहे का.?
पावसाळ्यात जनावरांना होऊ शकतात ‘ हे ‘ आजार ; हा उपाय करणे अत्यंत आवश्यक .
या सर्व विभागांमध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडेल व राहीलेली पेरणी पूर्ण होईल असे पंजाब डख सांगतात.
वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे असेही शेतकऱ्यांना ते आवर्जून सांगत आहेत.
हवामान अंदाज वर्तविणारे हवामान अभ्यासक पंजाब डख यांचे अंदाज आज पर्यंत अनेकदा खरे ठरत आले असून शेतकरी त्यांच्या अंदाजाची आवर्जून वाट बघत असतात.
पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 मराठवाडा