टीम कृषी योजना / Krushi Yojana
महाराष्ट्र राज्यात विविध भागांत पावसाची उघडीप कायम राहील शक्यता आहे. तर एक दिलासादायक बातमी आहे, गुरुवारपासून दि.8 पासून विविध भागांत पावसाला सुरूवात होणार आहे.
राज्यत्व कोकण व विदर्भ तसेच विविध भागात तर मध्य महाराष्ट्रातील मराठवाडा व इतर ठिकाणी जोरदार पाऊसाची शक्यता असून,पाऊस जोर धरेल असा अंदाज आहे. गुरुवारी दि. 8 जुलै पासून कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पूर्व विदर्भ,चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा या जिल्ह्या मध्ये विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविन्यात आली आहे.
हे ही वाचा …
इंजिन नसलेले ट्रॅक्टर आले, डिझेल शिवाय चालेल
‘कुक्कुटपालन योजना’ सुरू झाली | पाच लाख पंचवीस हजार रुपये अनुदान | असा करा अर्ज
नैऋत्य मोसमी वारे मान्सूनचे आगमन झाल्यापासून चांगल्या पाऊसाची प्रतीक्षा बळीराजा करत आहे. काही दिवसांपासून पाऊस नसल्याने कडक उन्हाचा चटका बसत असून, उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत.राज्यातील विविध भागांत आज मंगळावर ( दि.6 ) दुपारनंतर काही भागात ढगाळ वातावरण होत आहे.तर वाढत्या उष्णतेमुळे कमाल तापमानात वाढ दिसून आली आहे. विदर्भ व मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात चार (4 )अंश सेल्सिअस इतकी वाढ नोंदवण्यात आली. तर राज्यातील उर्वरित भागांत सरासरीच्या तुलनेत एक 1 ते तीन 3 अंश सेल्सिअस वाढ झाली आहे.
या ठिकाणी पडणार जोरदार पाऊस
मंगळवारी चंद्रपूर व गडचिरोलीत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बुधवारी पुणे, सातारा,सोलापूर,कोल्हापूर, सांगली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, लातूर,नागपूर,उस्मानाबाद, गडचिरोली,गोंदिया या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गुरुवार रोजी सातारा,परभणी, रत्नागिरी,नांदेड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर,हिंगोली,भंडारा, सांगली, चंद्रपूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर गडचिरोली, यवतमाळ, नागपूर या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
शुक्रवार रोजी पुणे,सातारा,नांदेड,उस्मानाबाद,,रत्नागिरी,सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर,अमरावती, परभणी, हिंगोली, लातूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,चंद्रपूर, बीड या ठिकाणी पाऊस पडेल.