या बाजार समितीत कांदा 4200 रुपये क्विंटल. या हंगामातील सर्वाधिक भाव

Advertisement

टीम कृषी योजना / Krushi Yojana

अनेक देशात कांद्यास कमी झालेली मागणी,देशांतर्गत काही राज्यात असलेले लॉकडाऊन यासर्वांचा परिणामी कांद्यास( Onion ) भाव गडगडले. कांद्याचा पुरवठा अनेक राज्यातून होत आहे.त्यामुळे कांद्याच्या ( Onion Rate ) दरात मोठी घसरण दिसत आहे. आखाती देशात व आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत पाकिस्तानचा कांदा 7 रुपय प्रति किलो या दरात उपलब्ध होत आहे. परंतु शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे , पिंपळगाव बसवंत ( Pimpalgaon Basvant Onion Market ) बाजार समिती मध्ये सेंद्रिय पद्धतीने केलेल्या उन्हाळी कांद्यास  4200 रुपये प्रतिक्विंटल इतका विक्रमी दर मिळाला. 4200 रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

Advertisement

हे ही वाचा…

Return of monsoon : राज्यात मान्सूनची वापसी ; हवामान तज्ज्ञाकडून या जिल्ह्यात पाऊसाची शक्यता.

निफाड तालुक्यातील सुकेने याठिकानचे कांदा उत्पादक शामराव सीताराम मोगल यांनी त्यांच्या शेतात कसल्याही प्रकारचे केमिकल व औषधांचा वापर न करता केवळ सेंद्रिय खतांचा वापर करून शेतात उन्हाळ कांद्याचे पीक केले. सेंद्रिय म्हणजेच विषमुक्त कांदा असल्याने बैलगाडीची सजावट करून सोबत संबळ वाजंत्री पथक घेऊन हा कांदा पिंपळगाव बसवंत बाजार समितीत दाखल झाला. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर शेतकरी बांधवांनी संबळच्या तालावर ताल धरला. या नंतर बाजार समितीच्या कार्यालया जवळ लिलाव प्रक्रिया झाली.त्यात शामराव मोगल या शेतकऱ्याच्या सेंद्रिय कांद्याचा सर्वोच 4200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. या हंगामातील हा सर्वाधिक दर आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker