टीम कृषी योजना / Krushi Yojana
मेळघाटातील डोंगर माथ्यावर बरेच शेतकरी शेती करतात. पारंपरिक पिक घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो.त्यातून म्हणावे असे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.यामुळे नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहेत.असाच एक शेतकरी स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळला. स्ट्रॉबेरी पिकास अनुकूल असलेल्या हवामानामुळे अवघ्या दहा गुंठे शेतीत तब्बल दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.त्यामुळे स्ट्रॉबेरी याच पिकावर संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून या ठिकाणी एक संशोधन केंद्र उभारण्यात यावे अशी विनंती करण्यात आली.
श्री शिवाजी कृषी विद्या महाविद्यालय कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या अनुदानातून या ठिकाणी अनेक प्रयोग केले गेले. चिखलदरा येथे दोन वर्ष शेतकऱ्यांवर संशोधन केलेल्या संशोधनाला यश मिळाल्यामुळे दहा गुंठे शेतीमध्ये सुमारे दोन लाखाचे उत्पन्न घेणे शक्य झाले आहे.
किसान क्रेडिट कार्ड द्वारे कर्ज प्रक्रिया झाली अगदी सोपी | 3 लाखांचं कर्ज अल्प व्याजदरात मिळणार
Sbi Laपैसे नसले तरीही जमीन खरेदी करू शकता | या योजनेद्वारे व्हा जमिनीचे मालक.
गवतापासून तयार होणार CNG गॅस ; शेतकऱ्यांकडून ‘ या ‘दराने विकत घेणार गवत.
सदरचे संशोधन यशस्वी झाल्याने येथे कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन केंद्र उभारण्यात आल्यास त्याचा मोठा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार आहे. श्री शिवाजी विज्ञान विद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शशांक देशमुख या बाबत महोटी देतांना सांगितले की, स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र निर्माण झाल्यामुळे मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांना अतिशय कमी दरात ही रोपे मिळतील तसेच स्ट्रॉबेरीच्या स्थानिक जाती विकसित करता येतील.यामुळे शीतगृह साठवण गृह तयार झाल्यास स्ट्रॉबेरीचे फळ जास्त दिवस टिकवून ठेवता येईल, असंही शशांक देशमुख यांनी सांगितले.