टीम कृषी योजना /Krushi Yojana
केरळमधून जोरात निघालेली मान्सून एक्स्प्रेस दोनच दिवसांत महाराष्ट्रात दाखल होऊन.नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्र राज्यातील जोरदार मुसंडी सुरूच असून, अवघ्या दोनच दिवसांत मान्सूनने राज्याचा ३० टक्के भाग व्यापला असून या भागात पाऊसाला सुरुवात देखील झाली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रा नंतर आता मराठवाडय़ातही मान्सूनने प्रवेश केला आहे.
येत्या काही दिवसात मान्सूनचा पाऊस राज्याच्या इतर सर्वच भागात प्रवेश करेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने व्यक्त केले आहे. काल व आज राज्यात अनेक ठिकाणी ( ६ व ७ जून ) रोजी पूर्वमोसमी आणि मोसमी पाऊसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे शेती कामांमध्ये लगबग बघावयास मिळत आहे.
केरळ राज्यात ३ जून रोजी नैऋत्य मोसमी पावसाने प्रवेश केला. त्यामुळे पाऊस पुढील एक आठवड्यात जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचेल असा अंदाज होता. मात्र पोषक वातावरनामुळे फक्त दोन दिवसात मान्सूनचा पाऊस ५ जून रोजी केरळ मधून महाराष्ट्रात दाखल झाला व त्याच दिवशी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर हे सहा जिल्हे व्यापले. दुसऱ्या दिवशी ६ जूनलाही पावसाने वेगाने प्रगती केली असून, रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग आणि पुणे जिल्ह्य़ातही प्रवेश करून तो पुणे शहरापर्यंत पोहोचला.मान्सून पावसाने रविवारी मराठवाडय़ापर्यंत भरारी घेतली असून पाऊस उस्मानाबादला पोहोचल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
पावसाचा पुढचा अंदाज काय असेल..?
कोकण किनारपट्टी ते केरळ पर्यंत सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने परिणामी दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात,मराठवाडयात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे.