महाराष्ट्रात मुसळधार पाऊस येणार ,पण….

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊसाचे महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस पडला.काही विभागात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला तर अनेक विभागात शेतकरी पाऊसाची आतुरतेने वाट बघत आहेत.

परंतु आता शेतकऱ्यांसाठी एक आनंद वार्ता असून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात जुलै महिन्यात पाऊस दमदार हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

योजनेची माहिती पहा – नवीन विहीर अनुदान योजना 2021 | बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना | योजनेची संपूर्ण माहिती

अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ३० जून पर्यंत प्रामुख्याने कोकण विभागात मध्यम सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात जून अखेरपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या हवेच्या चक्रीय स्थितीमुळे ओडिसा, छत्तीसगड, झारखंड, पूर्व मध्य प्रदेश या भागांत आणि विदर्भाच्या काही विभागात २६ ते ३० जून दरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

काही भागात वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सूनने १९ जूनपर्यंत देशाचा ९० टक्के भाग व्यापला असून पुढे पोषक वातावरण न मिळाल्यामुळे मान्सूनचा प्रवास थांबला गेला व त्याचा महाराष्ट्रातील पावसाच्या तीव्रतेवर परिणाम झाला…

शेतकरी बांधवांसाठी महत्वाची माहिती – पीएम किसान योजनेतून ४ हजार रुपये मिळवण्याची संधी | हे शेतकरी घेऊ शकतात फायदा.

Leave a Reply

Don`t copy text!

Discover more from krushiyojana.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading