टीम कृषी योजना / Krushi Yojana
आज पासून पुढे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.(Warning of torrential rains in this part of Maharashtra.) येत्या पाच ते सहा दिवसात कोकण मधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रा मधील पुणे, सातारा, कोल्हापूरसह विदर्भात काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार पाऊस पडणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोर पकडला आहे.राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडत असून.अनेक ठिकाणी तुरळक भावात पाऊसाचा सरी बरसत असून. येते पाच ते सहा दिवस कोकण ते रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्र मधील पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर यासह विदर्भा मधील काही भगत गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.तर राज्यातील राहिलेल्या उर्वरित भागामध्ये पावसाची रिमझिम किंवा उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे.
मागील आठवड्यात बंगालच्या उपसागर व गुजरात मधील किनाऱ्याजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. मॉन्सूनने देशातील सर्व भाग व्यापला असून या दोन्ही कमी दाबाच्या पट्या दरम्यान मॉन्सूनच कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. मध्य भारता मध्ये असलेल्या या पोषक वातावरणामुळे कोकणासह राज्याच्या अनेक भागा मध्ये पावसाला सुरुवात झाली असून तापमानात घट झाल्याचे दिसत आहे.
या ठिकाणी बरसणार मुसळधार पाऊस
शुक्रवार रोजी संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला
शनिवार रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी
सिंधुदुर्ग,वाशीम, यवतमाळ, बुलडाणा, चंद्रपूर रविवार -पुणे रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा सोमवार संपूर्ण कोकण, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर
हे ही वाचा –
महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृध्दी योजना 2021: ऑनलाईन नोंदणी | संपूर्ण माहिती |