टीम कृषी योजना / Krushi Yojana
सफरचंद हे फळ जर कुठलं असा प्रश्न कुणी विचारला तर साहजिकच तोंडावर नाव येत ते काश्मीरच. जर कुणी म्हंटल की सफरचंद मराठवाड्यात पिकतात तर अनेकांना पटणार नाही परंतु आज जी शेतकऱ्याची यशोगाथा बघणार आहोत तो शेतकरी आहे जागजी (उस्मानाबाद) मधील.
उस्मानाबाद मधील शेतकरी असलेले सावंत बंधु यांनी सफरचंदाची बाग केली व ती यशस्वी ही करून दाखवली.Successful apple production by farmers in Marathwada
- उष्ण भाग पाण्याची टंचाई म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा, उष्ण प्रदेशात सफरचंदाची बाग यशस्वी फुलवण्याचं काम केलं आहे शेतकरी कुटुंबातील सावंत बंधूंनी.त्यांच्या या सफरचंदाच्या प्रयोगाचे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.ही बाग बघण्यासाठी शेतकरी मोठी गर्दी करत आहेत. थंड प्रदेशात भरणारे हे फळ म्हणून सफरचंद हे फळाकडे पाहिले जाते. थंडहवेच्या ठिकाणी सफरचंदाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. दरवर्षी कश्मीरमधून मराठवाड्यात ट्रकच्या ट्रक भरून सफरचंद येतात. परंतु मराठवाड्यातूनच सफरचंदाचे उत्पन्न घेणारे हे दुर्मिळ उदाहरण असून सावंत बंधूंनी हे शक्य करून दाखवलं आहे. ( This is an example of apple production in Marathwada and Sawant brothers have made it possible. )
मराठवाड्यात असलेले उष्ण तापमान २५ ते ४५ अंश कायमच असते. उष्ण कटिबंध प्रदेशात सफरचंदाच्या फळाचे उत्पादन घेणे अवघडच.( Apple production in Osmanabad ) या परिस्थितीशी जुळवून घेत उस्मानाबाद मधील जागजी येथील सावंत या बंधूंनी एक एकर क्षेत्रावर सफरचंदाची बाग यशस्वी करून दाखवली आहे.२०१८ मधील जून महिन्यात एक एकर क्षेत्रावर २१० झाडांची लागवड केली. रोपे बाहेरच्या देशातून आयात करण्यात आली.
सावंत बंधू सांगतात की प्रथम आम्ही ड्रॅगन फ्रूट हे फळ पीक घेतले. त्यात यशस्वी झाल्यानंतर आता सफरचंदाचे उत्पादन घेतले आहे. त्यातही यशस्वी होत आहोत. मेहनत,तंत्रज्ञान व सातत्य याचा मेळ करत यशस्वी प्रयोग केला आहे.
जानेवारी 2021 मध्ये या झाडांना फळधारणा झाली असून.सध्या फळांची स्थिती चांगली आहे. एका एकरामध्ये सुमारे दोनशे दहा झाडांची लागवड झाली आहे. एका झाडाला १५ ते २० क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे.
शेतकऱ्यांनी विवीध प्रयोग राबवत शेती केली तर त्यात यश नक्कीच मिळत हे सावंत बंधूंनी दाखवून दिलं आहे.