फळबाग लागवड योजना 2021भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2021

फळबाग लागवड योजनेत शेतकऱ्यांना 50 हजारांपासून 1 लाखापर्यंत मदत, शासनाची तीन वर्षे आर्थिक मदत

 

टीम कृषी योजना /Krushi Yojana

Bhausaheb Fundkar Falbaag Lagvad Yojana Full Details

शेतकऱ्याची आर्थिक उन्नती व्हावी त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून राज्य सरकार नेहमी प्रयत्न करतं असत. केंद्र सरकारचे देखील या दृष्टीने प्रयत्न सुरू असतात. अल्प भूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या साठी महाराष्ट्र राज्य सरकारनं 2018-19 या वर्षा पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केली असून अनेक शेतकऱ्यांनी आज पर्यंत या योजने पासून लाभ घेतला आहे,घेत आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काय आहे पात्रता.?

राज्य सरकारने 2018 – 19 या वर्षात सुरु केलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे कमीत कमी 20 गुंठे जमीन असणं आवश्यक आहे. कोकणा तील शेतकऱ्यांसाठी ही अट शिथील करण्यात आली असून कोकणात शेतकऱ्यांना 10 गुंठे जमीन असली तरी या योजनेचा लाभ घेता येतो. कोकणात जास्तीत जास्त जमीन मर्यादा 6 हेक्टर असून महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यात ही मर्यादा 10 हेक्टर पर्यंत ठेवण्यात आली आहे. योजनेत पात्र लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यास त्याच्या क्षेत्रात विविध फळपिकांची लागवड करता येते. परंतु मुख्य अट ही आहे की आज पर्यंत राज्य सरकारच्या कुठल्याही फळबाग योजनेंचा लाभ घेतला असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेला लाभ घेता येत नाही.

फळबाग लागवड योजनेच्या पात्रतेचे निकष काय आहेत.?

शेतकरी स्वतः भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी अर्ज करु शकतो. शेतकऱ्याच्या नावावर 7/12 उतारा असणं बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्याचं कुटुंब केवळ शेतीवर अवलंबून आहे अश्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जात. अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक, महिला तसेच दिव्यांग व्यक्ती यांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी शासनाचे सहकार्य

खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे यासाठी राज्य शासन अर्धसहाय्य करते. या योजनेअतंर्गत फळबाग लागवड करायची असल्यास 1 मे ते 30 नोव्हेंबर च्या दरम्यान करावी लागते. योजना यशस्वी होण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीस विभागीय कृषी सहसंचालक, कृषी आयुक्तालय, रोपवाटिकाधारक यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

भाऊसाहेब फुंडकर योजनेत समाविष्ट फळझाडे.

 

काजू, डाळींब,मोसंबी, कांदी लिंबू, सिताफळ,नारळ, आवळा, जांभूळ, फणस,संत्रा, अंजिर,चिकूस, आंबा, कोकम,पेरू,चिंच इत्यादी झाडांचा समावेश आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी शेतकऱ्यांना एकूण तीन टप्प्यात अनुदानाची रक्कम दिली जाते. पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. फळपिकानुसार अनुदानाची रक्कम बदलत असते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!