पुढील 3 दिवस धोकादायक ; मुबई वेधशाळेने वर्तवला आहे हा अंदाज.

Advertisement

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

Advertisement

मुंबई वेधशाळेच्या वतीने आज शुक्रवार दि 23 जुलै रोजी दिलेल्या पाऊसाच्या इशाऱ्यानुसार राज्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवस धोक्याचे असतील अंदाज आहे.कोकण व मध्य महाराष्ट्रा मध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे.

महाराष्ट्रा मध्ये अनेक भागात मान्सूनच्या मुसळधार पावसाने जोर पकडला आहे,अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे तर अनेकांचे घरे,दुकाने पुराच्या पाण्यात गेली आहेत. दरड कोसळून मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या असून मुंबई वेधशाळेनं आज रोजी दिलेल्या अंदाजवरून राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. राज्यात सोमवार पासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. जेष्ठ हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

Advertisement

मुंबई वेधशाळेनं आज शुक्रवार दि. 23 जुलै रोजी पुणे, सातारा रायगड, कोल्हापूर,रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर,चंद्रपूर, यतवमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे.

मुंबई हवामान विभगानं उद्या शनिवार दि.24 जुलै रोजी सातारा व रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. ठाणे,पुणे,कोल्हापूर,सिंधुदुर्ग व रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट वर्तविण्यात आला आहे. रविवार दि.25 जुलै रोजी पुणे,सातारा, कोल्हापूर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट वर्तविण्यात आला आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page