Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

पीएम किसान योजनेस 30 महिने पूर्ण | आठव्या हफत्याचे पैसे जमा | सरकार कडून नवव्या हफत्याची तयारी.

टीम कृषी योजना / Krushi Yojana

पीएम किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये जमा केले जातात. पंतप्रधान किसान सन्मान योजनेस आजपर्यंत एकूण 30 महिने पूर्ण झाले आहेत. पीएम किसान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 31 जुलै पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू आहे. पीएम किसान योजनेच्या नवव्या हप्त्याची तयारी सुरू झाली केली आहे. आजपर्यंत देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख 37 हजार 354 कोटी रुपये पाठवले आहेत.

पीएम किसान सन्मान योजनेच्या नवव्या हप्त्याची तयारी.

केंद्र सरकरच्या पीएम किसान सन्मान योजनेच्या नवव्या हप्त्याची रक्कम देण्याची तयारी 1 ऑगस्टपासून सुरु केली जाणार असल्याचे समजत आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेमध्ये नोंदणी केलेली नाही,जे योजनेस पात्र शेतकरी असतील त्यांनी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी केली आणि त्यांच्या अर्जाची पडताळणी झाल्यास त्यांना आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळण्यास सुरुवात होईल. पीएम किसान सन्मान योजनेसाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येते.या योजनेची नोंदणी करण्यासाठी आपण आपल्या नजीकच्या आपले सरकार केंद्रात जाऊन नोंदणी करू शकता.

महत्वाची माहिती वाचण्यासाठी क्लीक करा – राज्यात ४९०० सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीचे ‘टार्गेट’! शेतकरी व शेतकरी पुत्रांना होणार फायदा 

हि महत्वाची बातमी वाचण्यासाठी क्लीक करा | शेतकऱ्यांना आनंदाची बातमी 3 लाख रुपयांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज

Leave a Reply

Don`t copy text!