टीम कृषी योजना / Krushi Yojana
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली महत्वकांक्षी योजना आणली होती.या योजनेचे नाव आहे ‘पीएम किसान योजना’ शेतकऱ्यांना शेती कामात थोडासा हातभार लागावा या उद्देशाने योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ६ हजारांची मदत केली जाते.लाखो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत परंतु तुम्ही अजूनही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे, आता तुम्हाला दोन वेळेस सलग दोन हजार रुपये असे चार हजार रुपये मिळवन्याची संधी आहे. ( Opportunity to get Rs. 4,000 from PM Kisan Yojana This can benefit farmers.)
यासाठी आपणास ३० जूनच्या आत किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी करावी लागणार आहे.जर तुम्ही ३० जूनआधी रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला ४ हजार रुपये मिळू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख..?
अजूनही देशभरात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी PM किसान सन्मान योजनेसाठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही. ज्यांनी आतापर्यंत अर्ज केलेला नाही आणि ३० जूनच्या आत अर्ज केला, तर त्या शेतकऱ्यांना ४ हजार रुपये मिळू शकतात. ३० जूनच्या आधी जर या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केलं, तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जुलै महिन्यात २ हजारांचा हफ्ता आणि ऑगस्ट महिन्यात पुढील PM किसान सन्मान योजनेचा नववा २ हजारांचा हफ्ता दिला जाणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्र ४ हजार रुपये येणार आहेत.
केंद्र सरकारने ही योजना सुरु केली तेव्हा केंद्राकडून केवळ लहान शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जायचा. मात्र, त्यानांतर या योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेत. आता देशभरातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.
पीएम किसान योजनेसाठी अशी करा नोंदणी…
पीएम किसान PM KISSAN नोंदणी करण्यासाठी आपणास किसान योजनेच्या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर या वेबसाईटवरील ‘फार्मस कॉर्नर’ वर जावं लागेल. तिथे तुम्हाला ‘न्यू फार्मर रजिस्ट्रेशन’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक भरावा लागेल. सोबत एक कॅप्चा भरून हा फॉर्म पुढे प्रोसेस होतो.
PM किसान योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजारांची मदत केली जाते. या योजनेअंतर्गत रजिस्टर्ड शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २ हजार रुपये दिले जातात. यातील महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतला नाही केवळ अशांनाच ४ हजार रुपये मिळू शकतात. यातील आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे ऑगस्ट महिन्यात या योजनेअंतर्गत नववा हफ्ता दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही उशिरा नोंदणी केली तर तुम्हाला ४ हजारांपासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे.
सध्या registration बंद आहे काय करावं