पंतप्रधान पीकविमा योजना 2021

पिक विमा मंजूर झाला की नाही पहा तुमच्या मोबाईल वर | सोपी पद्धत | बँकेत,कृषी कार्यालयात जाण्याची गरज नाही.

 

टीम कृषी योजना /Krushi Yojana

शेतकऱ्यांसाठी वरदान असलेली पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY)महाराष्ट्र राज्यात 2016 पासून राबवण्यात येत आहे. या पुर्वी सदर योजना बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आली होती. गेल्या वर्षा पासून सरकारने कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग नोंदविण्यास परवानगी दिली आहे.( Crop Insurance Scheme 2021 )
पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्याची शेतकऱ्यांची इच्छा असेल तरच ते सहभाग नोंदवू शकतात.

पीक विमा काढल्यानंतर तो मंजूर झाला की हे कुठे बघायचं?

पीक विमा काढला आहे परंतु तो मंजूर झाला की नाही हे कुठे बघायचे किंवा पीकविम्या संबंधी अडचण असेल कुठली तक्रार असेल तर ती तक्रार कुठे नोंदवायची. (complaint about crop insurance)
या विषयी अनेक शेतकऱ्यांना माहिती नसते. तर याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊ.

तुम्ही पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा काढला असेल तर आपला पिक विमा मंजूर झाला की नाही हे बघण्यासाठी आपणास कुठेही जाण्याची गरज नाही.आपण आपल्या मोबाईलवर चेक करून बघू शकता यासाठी आपणास सर्वप्रथम पंतप्रधान पीक विमा योजनेच्या PMFBY ची अधिकृत वेब साईट वर जावे लागेल. त्या नंतर Application Status हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

तुम्ही पीक विमा काढल्यानंतर पावती मिळाली असेल तर त्या पावतीवरील क्रमांक त्या ठिकाणी टाकावा लागेल त्यानंतर कॅप्चा त्याठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर Check Status या पर्यायावर क्लिक केल्यावर आपणास कळेल तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे किंवा नाही. तुमचा विमा मंजूर झाला असेल तर अप्रूव्ह असे लिहून येईल.

पीक विम्यासंबंधी तक्रार कुठे करावी..?

शेतकऱ्याने नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत पूर्वसूचना तक्रार नोंद द्यावी लागते.

मोबाईल मध्ये तुम्ही Crop Insurance App (क्रॉप इन्शुरन्स) ॲप डाउनलोड करावे त्याद्वारे किंवा विमा कंपनीला टोल फ्री क्रमांकाद्वारे ही पूर्वसूचना द्यावी.

वरील दोन्ही पर्याय उपलब्ध नसतील अथवा काही तांत्रिक अडचणी।असतील तर बँकेत किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात स्वतः जाऊन तक्रार नोंदवावी. तुमची तक्रार नोंदवून घेतली नाही तर तालुकास्तरीय विमा तक्रार निवारण समितीकडे जावे. अध्यक्ष असलेले तहसीलदार किंवा सदस्य सचिवपदावर असलेले तालुका कृषी अधिकारी तुमच्या तक्रारीची दखल घेतात. मात्र, याठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे तक्रारीची पोच घेणे गरजेचे आहे. पोच अर्जावरचा सही, शिक्का हा तुमच्या तक्रारीचा अधिकृत पुरावा असतो.

वरील माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांसमवेत शेअर करा.
इतर कुठल्याही योजनेची अथवा शेती विषयक माहिती पाहिजे असेल तर व्हाट्सअप वर मेसेज करा अथवा. खालील बॉक्स मध्ये कमेंट करा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!