पिक कर्जा वाचून एक ही शेतकरी वंचित राहता कामा नये – उपमुख्यमंत्री अजित पवार

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

पीककर्ज वाटप व इतर प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच दालनात बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीयकृत बॅंकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे पीक कर्जा वाचून कुठलाही शेतकरी वंचित राहता कामा नये या सज्जड शब्दांत बॅंक अधिकाऱ्यांना सुनावले. ( Not a single farmer should be deprived by reading crop loans – Deputy Chief Minister Ajit Pawar )

महत्वाची माहिती नक्की पहा – शेतकऱ्यांना पीक विम्याचा मिळणार मोठा फायदा | राज्य सरकारचा मोठा निर्णय | पीकविमा कंपन्यांना बसणार चाप.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्याचे जे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिलेले आहे त्याचप्रमाणे बँकांनी ते पुर्ण करावे व इतर कर्जपुरवठा हा राष्ट्रीयकृत बॅंकांच्या मदतीने व्हावा. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती कर्ज पुरवठा व्हायलाच हवा.
उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, अनिष्ट तफावतीमध्ये असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून कर्ज दिले जात नाही.या संस्थांना तफावतीमधून बाहेर काढावे,कारण नाशिक जिल्ह्यात ४५३ विविध सहकारी संस्था अनिष्ट तफावतीमध्ये आहेत. सहकार चळवळ टिकली पाहिजे सहकार संस्था जिवंत राहायला हव्या असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

ही माहिती पहा – राज्यातील ‘ या ‘ तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस; पेरण्या करता येणार.

‘महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना’ 2019 या योजनेपोटी जिल्हा बँकेला 920 कोटी रुपये मिळाले. त्यातील फक्त 231.51 कोटी पिक कर्ज वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे शेतऱ्यांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विनंतीनुसार उपमुख्यमंत्री कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

Leave a Reply

Don`t copy text!

Discover more from krushiyojana.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading