पावसाळ्यात जनावरांना होऊ शकतात ‘ हे ‘ आजार ; हा उपाय करणे अत्यंत आवश्यक .

Advertisement

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

Advertisement

पावसाळा म्हणजे शेतकरी,पशुपक्षी ,जीव,वृक्ष या सर्वांचा सर्वात आवडता ऋतू. कडक उन्हाळ्यानंतर येणाऱ्या या ऋतूचे शेतकरी आतुरतेने वाट बघतात, पाऊस पडल्यावर सर्वत्र मनमोहक वातावरण निर्माण होते.या सर्व चांगल्या बाबी असल्यातरी पावसाळ्यात काही आजार ही बळावत असतात. अश्या वेळी जनावरांना देखील आजार होण्याची शक्यता असते.यात काही जनावरे दगावण्याची भीती असते.
पावसाळ्यात जनावरांना संसर्गजन्य रोग, आजार होण्याची शक्यता असते. अशा आजारांना प्रतिबंधक लसीकरण करून होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल.

लसीकरण करताना कुठली काळजी घ्यावी.?

१. जनावरांचे लसीकरणा पूर्वी बाह्य परजीवींचे निर्मूलन करायला हवे.

Advertisement

२.जनावरांचे लसीकरणा पूर्वी किमान एक आठवडा पूर्वी जंत किंवा कृमिनाशकाचे औषध देने गरजेचे आहे.

३. जनावरांच्या शरीरात रोग प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना योग्य सकस पोषक आहार, क्षार,खनिज
यांचे मिश्रण द्यावे.

Advertisement

४. जनावरांचे लसीकरण नेहमी निरोगी व तंदुरुस्त जनावरांमध्ये करायला हवे.

५. चांगल्या कंपनीची नामांकित लसच द्यावी

Advertisement

६. लस ही योग्य तापमानाला व योग्य अवस्थेत साठवावी तसेच लसीची वाहतूक करताना योग्य प्रकारे करावी

७. गाभण जनावरांना लस टोचू नये

Advertisement

८. जनावरांना लस देताना लसीची मात्रा व देण्याची पद्धत व्यवस्थित पाळावी.

९.सर्व जनावरांना एकाच वेळी लस द्यावी

Advertisement

१०. जनावरांमध्ये लसीकरण नेहमी दिवसा व थंड वेळेतच करायला पाहिजे किंवा संध्याकाळी करायला हवं.

११. लसीकरणावेळी दोन वेगवेगळ्या लस एकत्र करून कधीही जनावरांना देऊ नये.

Advertisement

१२. जनावरांमध्ये लसीकरणाची सुई / सिरींज गरम पाण्याने उकळून घ्याव्यात साफ करण्यासाठी रसायनाचा वापर करू नये.

१३. जनावरांमध्ये लस टोचलेल्या जागी स्पिरिट किंवा आयोडीन चा किंवा कोणत्याही जंतु नाशकाचा वापर न करणे योग्य आहे.

Advertisement

१४. लस ही पूर्णपणे बर्फा तच ठेवावी जेणेकरून तिची कार्यक्षमता कमी होणार नाही.

१५. शिल्लक राहिलेली लस पुन्हा वापरू नये.

Advertisement

१६. लसीचा तपशील स्त्रोत प्रकार ,बॅच नंबर योग्य प्रकारे नोंद ठेवावी.

१७. लसीकरणानंतर जनावरांना अतिशय कष्टाची कामे करू देऊ नयेत किंवा त्यांना थकवा येईल अशी कामे करून घेऊ नये.

Advertisement

१८. लसीकरण हे पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावे

लसीकरणानंतरची गंभीर लक्षणे.

१. लसीकरणानंतर लगेच विचित्र क्रिया येऊ शकते अशावेळी त्वरित पशुवैद्यकाची संपर्क साधावा.

Advertisement

२. लस टोचल्याच्या जागेवर सूज येणे किंवा गरम लागणे दुखणे इत्यादी घटसर्प किंवा पर्याची लस टोचल्यावर दिसू शकतात.

३. जनावरांना काही वेळेस ताप येणे,भूक कमी होणे, थकवा व दुभत्या जनावरांचे दूध कमी होणे इत्यादी लक्षणे जाणवू शकतात.

Advertisement

लसीकरणानंतर कुठली काळजी घ्यावी.?

१. लसीकरणानंतर सुया व सिरींज एक तास उकळत्या पाण्यात ठेवाव्यात

२. ब्रुसेला सांसर्गिक गर्भपात या रोगांच्या लसी फार काळजीपूर्वक हाताळाव्या कारण त्यांच्या पासून संसर्ग होण्याचा धोका असू शकतो.

Advertisement

गायी म्हशींना लसीकरण करण्याची वेळ

घटसर्प (गळसुजी)
दरवर्षी मे जून महिन्यात पावसाळ्यापूर्वी

एक टांग्या/ फऱ्या
दरवर्षी मे जून महिन्यात पावसाळ्यापूर्वी

Advertisement

तोंडखुरी
दरवर्षी मार्च एप्रिल व नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात

पी पी आर
मे जून किंवा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात

Advertisement

आंत्रविषार
मे जून महिन्यात

वरील माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा.

Advertisement

महत्वाची माहिती – राज्यात लवकरच सर्वदूर पाऊसास होणार सुरुवात ; हवामान अभ्यासक पंजाब डख यांचे सूतोवाच.

महत्वाची माहिती नक्की पहा – शेती पीक कर्जात मोठी वाढ | तुमच्या पिकाला किती पीक कर्ज मिळणार | Crop loan New rates | वाचा सविस्तर

Advertisement

गाई व म्हैस गोठा अनुदान योजना 2021 | 77000 रुपये अनुदान मिळणार | असा करा अर्ज

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker