कृषी सल्लाशेती विषयक

पावसाळ्यात जनावरांना होऊ शकतात हे आजार.? | वाचा उपाययोजना.

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

सध्या पावसाचे दिवस सुरू झाले आहेत, पावसाळा आला म्हणजे त्या अनुषंगाने येणारे जनावरांमधील आजार हे येतातच. These diseases can affect animals in the rainy season.? | Read the solution. पावसाळ्यात जनावरांना फऱ्या, घटसर्प, लाळ्या खुरकूत,गोचीड ताप या सारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते.

ही पण बातमी वाचा – सर्व अंदाज चुकवत मान्सूनचे महाराष्ट्रात दमदार आगमन.

पावसाळ्यात जनावरांना कासेचे आजार मोठ्या प्रमाणात होत असतात त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे कासेची स्वच्छता व्यवस्थित ठेवली पाहिजे. त्यासाठी जनावरांचे दूध काढून झाल्यानंतर दिवसातून दोन वेळा जनावरांचे सर्व सड जंतूनाशक मध्ये बुडवून धरल्यास फायदा होतो.त्याकरता उपलब्ध असणारे जंतुनाशक मेडिकल स्टोअर मध्ये विविध नावाने मिळतात.

जास्त प्रमाणात पावसामुळे किंवा पूरस्थिती मुळे जागोजागी पाणी साचते व हे पाणी दूषित असते. असेच गढूळ पाणी दूषित पाणी जनावरे प्यायले तर जनावरांमध्ये रोगराई वाढण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.
म्हणून विहिरीचे किंवा नळाचे पाणी जनावरांना प्यायला द्यावे. गोठा च्या अवतीभवती छोटे खड्डे असतील तर ते खड्डे मुरूम टाकून बुजवावे.गोठ्यामध्ये खाचखळगे असल्यास त्यामध्ये जनावरांचे शेण व मूत्र साचून दलदल तयार होते. त्यामुळे जनावरांना कासदाह होण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा असे खाचखळगे मुरुमाने भरून घ्यावेत.

पावसाळ्यात कोवळा चारा फारच झपाट्याने वाढत असल्याने असा कोवळा चारा इतर चाऱ्याबरोबर अत्यंत कमी प्रमाणात खायला द्यावा. कारण कोवळ्या चाऱ्यामुळे जनावरांमध्ये अपचन, पोट फुगी चे आजार होऊ शकतात. या काळात गवत सुद्धा दूषित झालेले असते. शेतातील बांधाच्या उंचवट्यावर चे गवत आणि वाळलेला कोरडा चारा जनावरांना खायला दिला तर योग्य ठरेल.

पावसाळ्यात जनावरांना होणारे आजार

कासदाह:
या रोगामध्ये सडाला तसेच कासेला सूज येते. दूध अति पातळ व रक्त व पू मिश्रित येते. जनावर कासेला हात लावू देत नाही. दूध काढण्यापूर्वी कास जंतुनाशक ने कास स्वच्छ धुवावी.अधून-मधून कासदाह रोगासाठी दुधाची तपासणी करून घेणे.

घटसर्प:
या रोगात जनावरे एकाएकी आजारी पडते. खाणे पिणे बंद होते, अंगात ताप भरतो, गळ्याला सूज येऊन डोळे खोल होतात तसेच घशाची घरघर सुरू होते.या रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी निरोगी जनावरांना ऑइल ॲड जुवंट एच. एस. तेलयुक्त लस टोचून घ्यावी.

फऱ्या:
या रोगाची लक्षणे म्हणजे अचानक ताप येतो, मागचा पाय लंगड तो, जनावरांच्या मांसल भागाला सूज येते, सुज दाबल्यास चरचर आवाज येतो. या रोगासाठी प्रतिबंधक करण्यासाठी दरवर्षी सुरुवातीला जनावरांना लसीकरण करून घ्यावे.

तिवा:
या रोगामध्ये जनावरांना सडकून ताप येतो. जनावरांचे खाणे म मंदावते तसेच जनावर थरथर कापायला लागते, एका पायाने लंगड ते,मान, पाठ, डोळे व पायाचे स्नायू आकुंचन पावतात. या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी डासांचे निर्मूलन करावे.

पोटफुगी:
या आजारात जनावराची डावी कूस फुगते. जनावरे बेचैन होऊन त्यांचे खाणे व रवंथ करणे बंद होते. सारखी उठबस करतात. या रोगास प्रतिबंधक उपाय म्हणजे पावसाळ्यात ओला वकोवळा चारा अति प्रमाणात देऊ नये.

हगवण:
या प्रकारात जनावरास एकसारखे साधे अगर रक्त आणि शेन मिश्रित पातळ दुर्गंधीयुक्त शौचास होते. जनावरे मलूल होतात. अशुद्ध व घाणेरड्या चाऱ्यामुळे हा आजार उद्भवतो आजार टाळण्यासाठी शुद्ध पाणी व चांगले खाद्य द्यावे.

शेतकरी बंधूंना आपली जनावरे आजारी आहे की नाही हे लक्षात येत नाही व वेळीच उपाययोजना न केल्यामुळे जनावर दगावून खूप नुकसान होऊ शकते. आपले जनावर दगावून नये म्हणून खालील लक्षणे जनावरांमध्ये दिसल्यास लगेच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

आपणास ही उपयुक्त माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!