पंजाब डख यांचा नवा हवामान अंदाज | जून महिन्यात पाऊसाचा अंदाज | कुठे व किती पाऊस पडेल | संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज

 

टीम कृषी योजना/krushi yojana

गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले हवामान अभ्यासक ‘पंजाब डख’ यांनी आज पर्यंत दिलेले सर्व हवामान अंदाज जसेच्या तसे खरे ठरलेले आहेत. भारतीय हवामान विभागाने अनेकदा वेळवेगळे अंदाज वर्तवले परंतु ते प्रत्येक वेळी खरे ठरतात असे नाही. ( पंजाब डख हवामान अंदाज 2021 Panjab Dakh Havaman Andaj 2021 )

त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पंजाब डख यांचे सर्व अंदाज खरे ठरत आहेत व शेतकऱ्यांना आपली शेती कामे करताना याचा लाभ होतो योग्य नियोजन करता येते त्यामुळे शेतकऱ्यांनी पंजाब डख यांना अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.शेतकऱ्यांचे देवदूत असलेले पंजाब डख यांनी जून महिन्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे .

बघुयात काय आहे पंजाब डख यांचा पाऊसाचा अंदाज

राज्यात पूर्वेकडूण शॉर्टकट मार्गाने मान्सूचे आगमन झाले 10 ते 20 जून दरम्यान मान्सुन चा सर्वदूर कुठे वाहूनी तर कुठे मुसळधार पाउस पडणारच असे सांगत आहेत पंजाब डख.

10 जून पासून पाऊसास सुरवात होइल व 42260 गावामध्ये मान्सून पाऊस 20 जून पर्यंत पोहचेल व पेरणी होईल. एखादा भाग वंचीत राहू शकतो असे ते सांगतात.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.

1 फुट ओल गेली तर लागलीच पेरणी करावी . या पावसावर बळीराजाची पेरणी होइल.

पूर्व विदर्भात 12 ते 19 जून मुसळधार वाहूनी पाउस पडणारच . कोकन पट्टी 12 जून पासून 20 पर्यंत मुसळधार पाउस होइल. प .महाराष्ट्र 15 जून पासून 20 जून वाहूनी तर कुठे मुसळधार होइल .

उत्तर महाराष्ट्र 15 जून पासून 18 जून वाहूनी पाउस होईल. मराठवाडा 14 जून पासून मुसळधार तर कुठे वाहूनी पाउस होईल. प. विदर्भ 13 जून पासून 20 जून पर्यत मुसळधार वाहूनी होणारच. मुंबई ला 14 ते 17 दरम्यान अति मुसळधार पाउस होइल – जनतेने सतर्क रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत. दिलेल्या तारखेत एक दिवस पुढे,मागे वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे. शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो असे पंजाब डख यांनी सांगितले.

Leave a Reply

Don`t copy text!

Discover more from krushiyojana.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading