टीम कृषी योजना / Krushi Yojana
अल्प भूधारक अथवा अत्यल्प भूधारक शेतकरी बांधवांना शेती करताना सतत वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शेती जर जिरायत पट्यातील असेल सहामाही हंगामी शेतीवरच त्यांचे जीवनमान अवलंबून असते. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे त्यात आर्थिक स्थिरता यावी यासाठी सरकारचे सतत प्रयत्न सुरू असतात.विविध योजना आहेत ज्यातून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम सुरू असते अशीच एक योजना आहे ज्या द्वारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यास विहीर खोदकाम व बांधकाम करावया साठी अनुदान दिले जाते .आपण समजून घेऊयात या योजनेची अधिक माहिती.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी नवीन विहीर योजनेचे उद्दिष्ट्य
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये सामावेश करण्यात आलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामानबदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. संरक्षित सिंचनाची सोय निर्माण करणे व पीक उत्पादनात वाढ करणे हा योजनेचा हेतू आहे.
नवीन विहीरी अनुदानसाठी लाभार्थी निवडीच्या अटी आणि पात्रता –
प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठी ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना तसेच अनुसूचित जमाती/ जाती , महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येणार आहे. विहीर घेण्यासाठी एकूण जमिनीचे क्षेत्र हे ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्याकडे संरक्षित शेती सिंचनाची सोय नाही,अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा.
या आधी या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार नाही. लाभार्थी निवड करताना प्रास्ताविक नवीन विहीर व पिण्याच्या पाण्याचा सार्वत्रिक स्रोत यातील अंतर ५०० मीटरपेक्षा जास्त असल्याची खात्री करावी.
महाराष्ट्र भूजल अधिनियम अधिनियम २००९ नुसार पिण्याच्या पाण्याच्या श्रोताव्यतिरिक्त प्रास्ताविक विहीर व अस्तित्वात असलेल्या इतर विहिरीचे अंतर १५० मीटरपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
गावातील अस्तित्वातील व प्रास्ताविक असे एकूण सिंचन विहिरींची घंटा लागवडी योग्य क्षेत्रच्या ८ विहिरी प्रतिचौरस किलोमीटर पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेल्या लाभार्थ्यांच्या विहिरींसाठी स्थळ निश्चितीसाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्याकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र गरजेचे आहे.
अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रामध्ये विहिरी घेण्यास मनाई असणार आहे.
नवीन विहीर खोदणे व अन्य बाबींची पूर्तता या कामांसाठी कमाल १ वर्षाचा कालावधी अनुज्ञेय आहे.
नवीन विहिरी साठी योग्य किंवा अयोग्य जागा ठरवण्यासाठी मार्गदर्शक सूचना –
अ. नवीन विहिरी साठी योग्य जागा
दोन नाल्यांच्या जोडा मधील जागा ज्या ठिकाणी मातीचा थर किमान ३० सेंटिमीटर व कच्चा खडकाची किंवा मुरमाची जाडी ही किमान ५ मीटर आहे.
नदीच्या किंवा नाल्याच्या लगतचा उथळ गाळाच्या प्रदेशात रेती ग्रेवल इत्यादी मिश्रित असलेल्या जागेत नवीन विहीर बांधावी.
भौगोलिक दृष्ट्या सखल भाग ज्या ठिकाणी जेथे किमान ३० सेंटीमीटर पर्यंतचा मातीचा थर व किमान ५ मीटर खोली पर्यंत मुरूम म्हणजेच झिजलेला खडक आढळतो.
नाल्याच्या तीरावर जेथे उंचवटा आहे, तेथे परंतु सदर उंच भागावर चिकन माती नसावी.
घनदाट व गर्द पानाच्या झाडांच्या प्रदेशात.
वाळू रेती व गारगोटीच्या थर असलेल्या जुन्या नदीच्या प्रवाहाच्या पट्ट्यात नवीन विहिरी साठी योग्य जागा असणार आहे, तेथे नवीन विहीर घेण्यात यावी.
नदी किंवा नाल्याच्या तीव्र वळणाच्या ठिकाणी आतील भागात नवीन विहिरी साठी योग्य जागा असणार आहे, तेथे विहीर घेण्यात यावी.
अचानक दमट वाटणाऱ्या अथवा ओलाव्याचा असणाऱ्या जागेत नवीन विहिरी साठी योग्य जागा असणार आहे.
आ. नवीन विहिरीसाठी अयोग्य जागा
ज्या ठिकाणी जमिनीवर असा पक्का खडक सुरू होतो.
डोंगराळ भाग व डोंगराच्या पायथ्यापासून साधारण १५० मीटर अंतराचा भाग हा नवीन विहिरीसाठी अयोग्य असणार आहे.
ज्या ठिकाणी मुरूम किंवा कच्चा खडकाची खोली ५ मीटर पेक्षा कमी आहे.
ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे मातीच्या थराची जाडी किमान ३० सेंटीमीटर पेक्षा कमी आहे.
खारवट जमिनी चा भाग व खारपान पट्टा हा नवीन विहिरी साठी अयोग्य असणार आहे.
पोकारांतर्गत नवीन विहीरी साठी अनुदान किती –
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नवीन पाणीसाठवण निर्मिती म्हणजे नवीन विहिरी ची निर्मिती या घटकांतर्गत या घटकासाठी १०० टक्के अनुदान हे असणार आहे. ते दोन टप्प्यात देण्यात येईल, ते खालील प्रमाणे –
पहिला टप्पा – विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार एकूण खोत कामावरील खर्च
दुसरा टप्पा – विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार देय रक्कम
१०० टक्के अनुदान रुपये २.५० लाख अनुदान थेट लाभार्थीच्या आधार कार्ड संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येते.
नवीन विहीरी अनुदानसाठी आवश्यक कागदपत्रे –
७/१२ उतारा
८-अ प्रमाणपत्र
नवीन विहीरी अनुदानसाठी अर्ज कुठे करावा –
या योजनेस पात्र आणि इच्छुक शेतकऱ्यांनी https://dbt.mahapocra.gov.in या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
वरील योजनेची सर्व माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.आपणास या माहिती मध्ये काही त्रुटी अथवा चूक आढळल्यास आज कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा व योजनेच्या माहिती बद्दल आपण आपल्या कृषी कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष माहिती घ्या.शासकीय योजना या त्यांचा कोठा पूर्ण झाल्यावर अथवा निधी संपल्यावर बंद होतात त्यामुळे आपण कृषी अधिकारी,आपले सरकार केंद्र या ठिकाणी जाऊन माहिती घेऊ शकता.
धन्यवाद …