नगर जिल्ह्यासाठी 7 हजार 500 मेट्रिक टन खत उपलब्ध होणार.

 

टीम कृषी योजना /krushi yojana 

नेवासा तालुक्यात खरीप हंगामातील कपाशी, बाजरी, मका, सोयाबीन व  ऊस पिकासह इतर पिकांसाठी गरजेनुसार युरिया खत उपलब्ध व्हावे म्हणून राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील यांनी बुध दि 16 जुन 2021 रोजी नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क करून नेवासा तालुक्यास पुरवठा करण्यात आलेल्या एकूण खतामधून जो 691 मेट्रिक टन युरिया खताचा  बफर स्टॉक केलेला आहे त्यातील 70 टक्के म्हणजे 483.70  मेट्रिक टन युरीया  खत शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिकासाठी असलेली मागणी विचारात घेऊन तालुक्यातील परवानाधारक खत विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा केली होती. नेवासा  तालुक्यासाठी 483.70 मेट्रिक टन युरिया खत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सदरचे खत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या गावाजवळील अधीकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रामधून घेऊन जावे असे आवाहन नामदार शंकरराव गडाख यांनी केले आहे.

कृषिमंत्री ना.दादाजी भुसे  व  ना. शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नामुळे नेवासा तालुक्यासाठी आत्तापर्यंत पुरवठा झालेल्या 2076 मेट्रिक टन युरिया खतापैकी तालुक्यात युरीया  खताची मोठी टंचाई असतांना मुळा बाजार मार्फत सोनई व  नेवासा येथून 130 मेट्रिक टन युरीया खताची 939 शेतकऱ्यांना विक्री करण्यात आली. मुळा बाजार मार्फत तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना युरीया खत मिळावे म्हणून  प्रत्येक शेतकऱ्यास तीन गोण्या खत  आधार कार्ड लिंक करून व प्रति गोणी 266 रुपये दराप्रमाणे उपलब्ध करुन देण्यात आले.

 

आता खताचे बफर स्टॉकमधून ना. गडाख यांच्या प्रयत्नामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना 483.70 मे. टन युरीया  अधिकृत परवानाधारक खत दुकानदारामार्फत उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

 जिल्ह्यातील खताची टंचाई लक्षात घेऊन नामदार शंकरराव गडाख यांनी बुध दि 16 जुन 2021 रोजी आर.सी.एफ., नर्मदा व जी.एस.एफ.सी  या प्रमुख  खत कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून सविस्तर चर्चा केली. त्यानंतर संबंधित कंपन्यांनी येत्या आठ दिवसात नगर जिल्ह्यासाठी 7 हजार 500 मेट्रिक टन खत उपलब्ध करून देण्याचे मान्य केल्याने नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतक-यांचा  खताचा प्रश्न सुटणार असल्याचे  नामदार गडाख यांनी सांगितले.

Leave a Reply

Don`t copy text!

Discover more from krushiyojana.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading