Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

दूध दरात होणार वाढ; दुधाला उसाप्रमाणे एफआरपीचा कायदा करणार | झाला मोठा निर्णय

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

दुधाचे पडलेले दर त्यावरून राज्यात झालेले मोठे आंदोलन,
दूध उत्पादकांच्या मागण्या व त्यावर तोडगा काढण्यासाठी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी किसान सभा, शेतकरी संघटना व दूध संघांच्या प्रतिनिधींची महत्वाची बैठक शुक्रवारी मंत्रालयात घेतली.
दरम्यान लॉकडाऊन होण्या पूर्वी राज्यात दुधाला मिळत असलेले दर पुन्हा पूर्ववत होण्यासाठी दूध खरेदी दर वाढविण्यात येतील तसेच ऊसा प्रमाणे दुधालाही एफ.आर.पी. कायदा लागू केला जाईल.हा कायदा सहकारी, खाजगी दूध संघ, कंपन्या यांना लागू होईल असा तोडगा या बैठकीत झाला.( Milk price hike; Milk will be FRP law like sugarcane | It was a big decision. )

ही महत्वाची बातमी नक्की पहा – मान्सूनच्या पाऊसास होणार सुरुवात ; पोषक वातावरण झाले निर्माण. जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता ; हवामान विभाग

लॉकडाऊपूर्वी दुधाला प्रति लिटर ३५ रुपये दर मिळत होता हा दर तातडीने सुरू करावा. साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधारभावासाठी एफ.आर.पी. व शिल्लक मिळकतीत हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरींग असे कायदेशीर संरक्षण लागू करावे.

शेतकरी प्रतिनिधी, दूध संघ व खाजगी दूध कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्या मध्ये जोरदार चर्चा झाली. या चर्चेअंती वरील तोडगा काढण्यात आला. ऊस क्षेत्राप्रमाणे दुधालाही रेव्हेन्यू शेअरींचे धोरण लागू करण्याबाबत मात्र बैठकीत सर्वसंमती झाली नाही. रेव्हेन्यू शेअरिंग बाबत अधिक अभ्यास करण्यासाठी वेळ द्या अशी विनंती यावेळी मंत्री सुनील केदार यांनी केली.

कुसुम सौर पंप योजना 2021 | Kusum Solar Pump Online form

यावेळी दूध विकास मंत्री सुनील केदार, माजीमंत्री डॉ.अनिल बोंडे, माजीमंत्री सदाभाऊ खोत, किसान सभेचे डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, राष्ट्रवादीचे आ.डॉ.किरण लहमटे, शेतकरी प्रतिनिधी धनंजय धोरडे, विठ्ठल पवार, दूध संघाचे प्रतिनिधी रणजित देशमुख, प्रकाश कुतवळ, दादासाहेब माने, गोपाळराव म्हस्के, विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार आदी उपस्थित होते.

यांत्रिकीकरण ट्रॅक्टर अनुदान योजना 2021 | योजनेची संपूर्ण माहिती व अर्ज करण्याची पद्धत

Leave a Reply

Don`t copy text!