अहमदनगर जिल्ह्यातील हे प्रसिद्ध कांदा मार्केट सोमवार पासून होणार सुरू.

Advertisement
कृषी योजना / Krushi Yojana 
महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेमुळे वाढलेली रुग्ण संख्या रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून  2 महिन्या पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  सर्व उद्योग व्यवसायासह कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद ठेवण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात नावाजलेले घोडेगाव कांदा मार्केट 7 जूनपासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. अनेक दिवसांपासून नेवासा तालुक्यासह नगर,औरंगाबाद व जालना या जिल्ह्यातील शेतकरी मार्केट सुरू होण्याची वाट बघत होते. परंतु मार्केटमध्ये होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन संभाव्य धोका टाळण्यासाठी मार्केट बंद होते. This famous onion market in Ahmednagar district will start from Monday.
फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करून बाजार समिती सुरू कराव्यात, असे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी चर्चा करत दिलेल्या सूचनेनुसार शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बाजार समितीचे सभापती, उपसभापती सचिव, संचालक मंडळ, हमाल मापाडी व व्यापारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये सर्वांचे एकमत झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपआवार घोडेगाव काही अटी शर्थी ठेवून 7 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे यामुळे शेतकऱ्यांना  शेतातील कांदा विक्री करणे सोईस्कर होणार आहे.
मार्केट सुरू होणार असल्याचे कळताच तालुक्यातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून अनेक दिवसांपासून शेतात पडून असलेला कांदा विक्री करून पुढील खरिपासाठी बियाणे, खते खरेदीसाठी पैसा उपलब्ध होणार आहे. सोमवार, बुधवार  व शुक्रवार या दिवशी कांदा लिलावाची आवक सकाळी 7.00 ते 11.00 वाजेपर्यंत बाजार आवारात स्वीकारली जाईल.
 सकाळी 11 वाजल्यानंतर कांद्याची आवक स्विकारली जाणार नाही.
मंगळवार, गुरुवार व शनिवार या दिवशी कांदा  लिलाव सकाळी 8.00 ते 11.00 या वेळेत होतील. कुठल्याही परिस्थीतीत कांदा लिलावाच्या दिवशी आवक स्वीकारली जाणार नाही.
बाजार आवरामध्ये येतांना प्रत्येकाने आपल्या नाकाला व तोंडाला मास्क लावणे  तसेच सर्वांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे अनिवार्य राहील असे मार्केट कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page