Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

जमिनीच्या ‘सात बारा’ मध्ये होणार ‘हा’ मोठा बदल | ऑनलाइन फेरफार बद्दल सविस्तर माहिती

 

टीम कृषी योजना/krushi yojana

सर्वत्र जमिनीचे व्यवहार करत असताना सातबारा हा शब्द आपन नेहमीच ऐकत असतो.कुठल्याही व्यवहारापूर्वी सातबारा आधी बघितला जातो. सात बारा हा जमिनीशी निगडित शब्द आहे.हा ‘सात बारा’ प्रत्येकालाच समजतो असे नाही. यामुळे सरकारने आता हा ‘सात बारा’ सोपा करण्याचा विचार केला आहे. हा उतारा सर्वांना समजेल अशा भाषेत येणार असून त्यावर क्युआर कोडही असणार आहे.

ही महत्वाची माहिती नक्की पहा – पिक विमा मंजूर झाला की नाही पहा तुमच्या मोबाईल वर | सोपी पद्धत | बँकेत,कृषी कार्यालयात जाण्याची गरज नाही.

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ‘सात बारा’ मध्ये हे बदल करण्याचा निर्णय घेणात आला आहे.
गावचा नकाशा ,शेत जमीन, गावठाण यांच्याशी निगडीत येणारा शब्द म्हणजे सातबारा व आठ अ. गावाकडे या फेरफार शब्दाला फार मोठे स्थान आहे. एखाद्या जमिनीची नोंदणी, वारस नोंदणी, आकार, जमीन खरेदी विक्री,जमिनीवर बोजा चढवणे, जमिनीवर बोजा उतरवणे या संबंधित महत्वाचा सरकारी कागद म्हणजेच जमिनीचा फेरफार. जमिनीची खरेदी विक्री करताना फेरफार तपासला जातो. यासाठी सरकारी कार्यालयांना हेलपाटे घालावे लागतात,पैसे द्यावे लागतात,अधिकाऱ्याची हाजी हाजी करावी लागते. आता मात्र सरकारने खास तुमच्यासाठी घर बसल्या ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
महाराष्ट्र सरकारने महसूल विभागात बरेचसे कामे ऑनलाईन पद्धतीने चालू केली आहे. त्यापैकी हे सातबारा, आठ अ, हेसुद्धा आपण ऑनलाईन बघू शकतो.

बोंडअळीचा प्रार्दूभाव टाळण्यासाठी कापसाची लागवड १५ जूननंतरच करा – कृषी विभाग

सातबारा ऑनलाइन पाहाण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगल वर https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल.
या संकेत स्थळावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र सरकारचे महसूल विभागाची वेबसाईट दिसेल. त्यानंतर आपली चावडी हा पर्याय तिथे उपलब्ध असेल, या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डिजिटल नोटीस बोर्ड नावाचे पेज उघडेल. त्या पेजवर तुम्ही तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि गावाचे नाव इंटर करायचे आहे.

ही महत्वाची योजना नक्की पहा – कांदा चाळ अनुदान योजना 2021 | योजनेची संपूर्ण माहिती व मार्गदर्शन

यानंतर तुमच्या गावातील सगळ्या फेरफार नोंदी तुम्हाला दिसतील. या फेरफार नंबर तुम्हाला दिसतील या फेरफार नंबर आले पुढील पहा हा पर्याय दाबल्यास एक पेज ओपन होऊन त्यामध्ये तुम्हाला गट नंबर, फेरफार चा प्रकार आणि तारीख दिसेल. यावरून आपण मोजणी सुद्धा मागू शकतो, किंवा दुसरी कोणी मागवली असेल ते सुद्धा आपल्याला कळू शकते.

Leave a Reply

Don`t copy text!