कुसुम सौर पंप योजना 2021 | Kusum Solar Pump Online form

Advertisement

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

Advertisement

शेतकऱ्यांना शाश्वत विजेचा पुरवठा व्हावा,याद्वारे त्यांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने केंद्र सरकारने कुसुम सौर पंप योजना या अभियानाची सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून एक लाख सौर पंप उभारण्यात येणार आहेत. ( कुसुम सौर पंप योजना 2021 | Kusum Solar Pump Online form )

सौर पंप योजनेद्वारे एक लाख पंप उभारण्यासाठी 1969 कोटी खर्च अपेक्षित असून 30 टक्के म्हणजे 585 कोटी केंद्राकडून व 173 कोटी लाभार्थीकडून उपलब्ध होणार आहेत एक हजार 211 कोटी इतका निधी राज्य शासन उपलब्ध करणार आहे.
पुढील पाच वर्षात 436 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद व 775 कोटी अतिरिक्त वीज विक्री कर यामार्फत निधी उभा केला जाणार आहे.

Advertisement

कुसुम सौर पंप योजनेद्वारे येत्या पाच वर्षात 5 लाख सौर कृषि पंप उभारण्यात येतील व त्यापैकी पहिल्या वर्षातील मंजूर एक लाख सौर कृषि पंप उभारण्यासाठी ऊर्जा विकास विभागामार्फत अर्जदारांची ऑनलाईन अर्ज मागून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर योजना राबविण्यात येणार आहे यात 2.5 एकर क्षेत्र असणाऱ्या करणाऱ्या शेतकऱ्याचे 3 HP , 5 एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांची 5 HP व त्यापेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यास 7.5 HP डीसी पंप बसवण्यात येणार आहेत.
सौर कृषी पंपाच्या किमतीच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून सर्व कृषी पंपाच्या किमतीच्या दहा टक्के व अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांकडून पाच टक्के या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने 30 टक्के वित्तीय सहाय्य व राज्य शासनाने 60 ते 65 टक्के अनुदान व लाभार्थ्यांचे 10 ते 15 टक्के अंशदान लागणार एकूण उद्दिष्टं पैकी प्रथम टप्प्यात 50 टक्के सौर कृषी पंप 34 जिल्ह्यात त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर नंतर मागणीनुसार वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कुसुम योजना ऑनलाइन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

Advertisement

पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधीत खात्याचा ना हरकत दाखला.

७/१२ उतारा (विहीर / कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना-हरकत प्रमाणपत्र रु.२००/- च्या मुद्रांक कागदवर सादर करावे.

Advertisement

शेत जमिन/विहीर/पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.

अनुसुचित जाती/जमातीचे/इतर मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र.

Advertisement

महत्वाची माहिती – शेळीपालन करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी खुशखबर ; शेळीपालनासाठी मिळत आहे स्वस्त दरात कर्ज.

कुसुम योजनेचा शेतकऱ्यांना मिळणारा फायदा

२४ तास लाइट राहील,ज्यामुळे शेतकर्यांना शेताला पुरेपूर पाणी देता येईल.

लाईट बिल वाचेल व आर्थिक लाभ होईल , त्याच पैशातून शेतकऱ्याला त्याच्या इतर शेत गरज पूर्ण करता येतील .

Advertisement

कुसुम योजना २०२१ नुसार शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल व शेतकरी समृद्ध होईल.

कुसुम सौर पंप योजनेसाठी पात्रता काय आहे.?

वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारे नदी नाले यांच्या शेतात शेजारी शेत जमिनी धारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहणार आहेत.

Advertisement

शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी याच्यामध्ये पात्र राहतील.

मात्र अशा शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक राहील सर्वात पहिल्यांदा विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक राहणारे आणि शेतकऱ्यांकडे शास्वत जलस्रोत तो आपण प्रकार म्हणतो काम करताना जो जवळ असतो तर असा प्रकार असतो तो इथे उपलब्ध असणं गरजेच आहे.

Advertisement

5 एकरापर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप,

2.5 ते 5 एकरापर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप.

Advertisement

आणि 5 एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील.

तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.

Advertisement

योजनेची माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना पाठवा.

शासकीय योजना असल्याने योजनेचा कोठा पूर्ण झाल्यास योजना काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात येऊ शकते. योजनेचे ऑनलाइन फॉर्म बाबतीत अधिक माहिती साठी नजीकच्या सेतू अथवा आपले सरकार केंद्रात चौकशी करा.

Advertisement

Related Articles

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page