टीम कृषी योजना / Krushi Yojana
उन्हाळी कांदा सध्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मोठ्या प्रमाणात विक्री साठी येत आहे,अहमदनगर जिल्ह्यातील कांदा तसेच बाहेरील इतर जिल्ह्यातूनही कांदा विक्रीसाठी येत असल्याने आवक वाढत आहे,गेल्या आठवड्यात नेवासा तालुक्यातील घोडेगाव कांदा मार्केट मध्ये एकाच दिवशी ४१७ ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता ही आवक त्या दिवशी राज्यात सर्वाधिक होती.
अहमदनगर मधील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.२४) कांद्याची मोठी आवक आली होती. सर्वात सुपर क्वालिटी कांदा वक्कल २७०० रुपये क्विंटलने विक्री झाले, एक दोन लॉट २७०० ने विकले गेले, लिलावात नंबर एकच्या कांद्यास १६०० ते २२०० रुपयांचा दर मिळाला. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्येही कांद्याची चांगली आवक होती.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनके बाजार समित्या दोन ते अडीच महिने बंद होते. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून कांद्याचे लिलाव सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्य मध्ये नगर, राहुरी, राहाता, घोडेगाव (नेवासा) पारनेर, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव,शेवगाव बाजार समितीत कांद्याची खरेदी-विक्री होत असते.यातील काही मार्केट मध्ये देशातून व्यापारी खरेदीसाठी येतात.
गुरुवार दि २५ जून रोजी नगर बाजार समितीत नंबर एक च्या कांद्यास १६०० ते २२०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला.
दोन नंबरच्या मीडियम कांद्यास १०५० ते १६०० रुपये , तीन नंबरच्या कांद्यास ६०० ते १०५० रुपये तर चार नंबरच्या कांद्यास ३०० ते ६०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. पंधरा दिवसांपूर्वी १६०० रुपयांपर्यंत तर गेल्या आठवड्यात सर्वाधिक १९०० रुपयांपर्यंत सरासरी दर होता, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.
नेवासा तालुक्यातील घोडेगाव कांदा मार्केट मध्ये बुधवार दि २४ रोजी ४०० ट्रक कांदा आवक झाली होती.यात सर्वाधिक भाव २५०० रुपये मिळाला. सर्वात भारी दर्जाच्या कांद्यास हा भाव मिळाला तर मोठ्या मालास १८०० ते २३०० रुपयांपर्यंत भाव निघाला.