आजचे कांदा बाजार भावकृषी सल्ला

उन्हाळी कांद्याच्या भावात का होत आहे घसरण.? भाव वाढण्याची शक्यता आहे का.?

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

महाराष्ट्रात मोठ्या प्रमानात कांद्याचे उत्पादन घेतले जाते,महाराष्ट्रातील कांदा (Onion from Maharashtra) देशातील अनेक राज्यात पाठवला जातो,गेल्या दीड महिन्यापासून कांद्याचे भाव टिकून होते परंतु गेल्या आठवड्यापासून उन्हाळी कांदा ( Summer onion ) काही प्रमाणात गडगडला आहे. कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरत आहेत.( Onion prices are falling sharply.)

मागील आठवड्याचा तुलनेत कांदा प्रती क्विंटल शंभर ते तीनशे रुपयांनी घसरला आहे.

 हे ही वाचा..

कांदा साठवणुकीची नवी पद्धत ; दोन वर्षे टिकतो कांदा | ‘या’ शेतकऱ्याने सांगितली नवीन पद्धत

कांदा चाळ अनुदान योजना 2021 | योजनेची संपूर्ण माहिती व मार्गदर्शन

अहमदनगर जिल्ह्यातील या कांदा मार्केट मध्ये 2 लाख कांदा गोण्यांची आवक ; मार्केट राज्यात ठरतंय अग्रेसर

कांदा निर्यात करण्यावर मर्यादा आल्याने ही परीस्थिती झाली आहे.त्याच प्रमाणे पाकिस्तानचा कांदा (pakistan onion) भारतीय कांद्यापेक्षा( Onion Rate ) सात रुपये प्रती किलो दराने स्वस्त मिळत आहे.तसेच श्रीलंका,बांगलादेश, थायलंड,मलेशिया मध्ये लॉकडाउन मध्ये वाढ झाल्याने कांद्याची मागणी कमी झाली आहे.

त्याच प्रमाणे पाकिस्तानचा कांदा ( Pakistan Onion ) भारतातील कांद्यापेक्षा ( Indian Onion ) सात रुपये प्रति किलोने स्वस्त दरात मिळत आहे. एक हजार आठशे ते दोन हजार दोनशे रुपयांपर्यंत गेलेलं कांदा बाजार भाव तीनशे रुपयांनी गडगडले आहेत. एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पर्यन्त भाव खाली आले आहेत. मालाचा सरासरी दर खाली आला आहे. देशाअंतगत विविध मोठ्या बाजार पेठेत राज्यातील कांदा जात आहे, पुढील महिन्यात मध्य प्रदेशचा कांदा ( Madhyapradesh Onion ) बाजारात येणार आहे.

अनेक राज्यात आज ही लॉकडाऊन ,निर्बंध असल्या कारणाने मागणी कमी आहे.

पाकिस्तान मधून येणाऱ्या कांद्याचा दर ( Pakistan Onion Rate ) प्रती टन २९० डॉलर आहे, तर भारतातील कांद्याचा दर प्रती टन ३७० डॉलर पर्यन्त आहे.

आखाती देशात पाकिस्तानचा कांदा पाठवण्यासाठी भाडे भारतीय कांद्यापेक्षा कमी आहे.आखाती राष्ट्रात पाकिस्तानच्या कांद्यास पसंती मिळत आहे. आखाती देशांसोबत श्रीलंका, बांगलादेश, थायलंड मलेशिया या देशांमध्ये कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यामधून मागणी लॉकडाऊन मुळे कमी आहे.
जुलै व ऑगस्ट महिन्यात देशात पाऊस किती प्रमाणात पडतो यावर पुढील गणित अवलंबून राहील असे मत जेष्ठ व्यापारी व्यक्त करत आहेत. ( Onion prices will depend on the rains in July-August )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!