टीम कृषी योजना / Krushi Yojana
युरियाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. IFFCO इफको म्हणजेच इंडियन फार्मर फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड ने शेतकऱ्यांसाठी नॅनो युरियाच लॉचिंग केल आहे. इफको या कंपनीच्या 50 व्या वार्षिक बैठकीमध्ये नॅनो युरियाचे लाँचिंग करण्यात आले आहे. नॅनो युरिया लाँच करण्याचे मुख्य कारण म्हणजे सामान्य युरिया ची मागणी 50 टक्क्यांनी कमी व्हावी या करता सरकारने नॅनो युरिया चे लॉचिंग केले आहे.
हा नॅनो युरिया शेतकऱ्यांना लिक्विड स्वरूपात उपलब्ध होणार आहे. 500 मिली नॅनो युरिया मध्ये 40 हजार पीपीएम नायट्रोजन उपलब्ध असतो. यामुळे जी पोषणतत्वे 50 किलोच्या युरिया बॅग मधून मिळतात तीच पोषण तत्वे या नॅनो युरिया मधून मिळणार आहे.
स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे हा नॅनो युरिया तयार करण्यात आला आहे. नॅनो जैवतंत्रज्ञान संशोधन संस्था कलोल येथे या नॅनो युरिया ची निर्मिती करण्यात आली आहे.
मंगळवार पासून म्हणजेच 1 जून 2021 पासून हा नैनो युरिया शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाला आहे. 500 मिली नॅनो युरिया ची बॉटल 240 रुपयांना उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना हा युरिया सामान्य युरिया च्या 10 टक्के किमतीला उपलब्ध होणार आहेत. पण नॅनो युरिया वापराच्या आधी नॅनो युरिया च्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हा नॅनो युरिया द्रावण स्वरूपात बॉटल मध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च देखील वाचणार आहे. यामुळे नॅनो युरियाचा वापर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रणालीच्या अंतर्गत 20 ICAR, देशातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रांमध्ये 43 पिकांवर या नॅनो युरियाची चाचणी करण्यात आली आहे. त्यांनतर संपूर्ण भारतातील पिकांवर नॅनो युरिया ची परीणामकारकता तपासण्यासाठी 94 पिकांवर याची चाचणी करण्यात आली. या चाचण्यामधून अशे निष्कर्ष काढण्यात आले की नॅनो युरिया च्या वापरामुळे पिकांच्या वाढीमध्ये 8 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात अली आहे. जमिनीतील पाण्याची गुणवत्ता वाढण्यासाठी नॅनो युरिया चा फायदा होतो. ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी देखील या नॅनो युरिया चा वापर होतो. विशेष म्हणजे मातीची गुणवत्ता देखील सुधारण्यास नॅनो युरिया चा वापर होत आहे. त्यामुळे पुढील काळात महाग युरियास पर्याय म्हणून नॅनो युरियाचा वापर करून शेती मध्ये फायदा होऊ शकतो.
वरील माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा.