बाजारभावशेती विषयक

आनंद वार्ता – केंद्र सरकारने खरीप पिकांच्या आधारभूत किंमतीमध्ये केली वाढ |शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न | असे असतील नवीन दर

 

टीम कृषी योजना /krushi Yojana

केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे याद्वारे शेतकऱ्यांच्या धान्यास आधारभूत किमती वाढवून दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

देशाचे कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर म्हणाले कि गेल्या ७ वर्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्ना मध्ये वाढ होईल यासाठी काही ठोस व मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतमालास किमान आधारभूत किंमत २०१८ पासून किंमतीवर ५० टक्के परतावा जोडून जाहीर केली जाते. चालू खरीप विपणन हंगामासाठी (KMS) २०२०-२१ (६ जून २०२१ पर्यंत गेल्या वर्षीच्या ७३६.३६ एलएमटी च्या तुलनेत किमान आधारभूत किंमतीवर एलएमटी पेक्षा जास्त धान्य खरेदी केले गेले ज्यामुळे शेतकऱ्यांना यांचा फायदा झाला आहे.

पिकांना वाढून दिलेल्या नवीन आधारभूत किमती.

धान्य (सामान्य) – १९४० रुपये (आधारभूत

रुपये).

किमतीत वाढ- ७२

धान्य ( ग्रेड ए ) – १९६० रुपये (आधारभूत किमतीत वाढ ७२

रुपये).

ज्वारी (हाईब्रिड) – २७३८ रुपये (आधारभूत किमतीत वाढ –

११८ रुपये).

ज्वारी (मालदांडी) – २७५८ रुपये (आधारभूत किमतीत वाढ

११८ रुपये).

बाजरी – २२५० रुपये (आधारभूत किमतीत वाढ – १००

रुपये).

नाचणी- ३३७७ रुपये (आधारभूत किमतीत वाढ ८२ रुपये). मका- १८७० रुपये (आधारभूत किमतीत वाढ २० रुपये). तूर ६३०० रुपये (आधारभूत किमतीत वाढ- ३०० रुपये). उडीद – ७२७५ रुपये (आधारभूत किमतीत वाढ ७९ रुपये). भुईमूग ५५५० रुपये (आधारभूत किमतीत वाढ २७५ रुपये).

सूर्यफूल बियाणे ६०१५ रुपये (आधारभूत किमतीत वाढ –

१३० रुपये).

सोयाबीन ३९५० रुपये (आधारभूत किमतीत वाढ ७०

रुपये).

तीळ – ७३०७ रुपये (आधारभूत किमतीत वाढ – ४५२ रुपये). कापूस (मध्यम रेशा ) – ५७२६ रुपये (आधारभूत किमतीत वाढ – २११ रुपये).

कपास (लांब रेशा)-५०२५ रुपये (आधारभूत किमतीत वाढ २०० रुपये).

अशा नवीन आधारभूत किमती असतील,शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!